27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडे यांची संवेदनशिलता; पाऊस लांबल्यामुळे कृषीमंत्रीपदाची जाण ठेवत वाढदिवस न साजरा...

धनंजय मुंडे यांची संवेदनशिलता; पाऊस लांबल्यामुळे कृषीमंत्रीपदाची जाण ठेवत वाढदिवस न साजरा करण्याची घोषणा

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा एक गट सहभागी झाल्यानंतर १३ व्या दिवशी खाते वाटप झाले. यामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे कृषीमंत्री म्हणून जबाबदारी आली आहे. राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते, तसेच राज्यात या आधी मंत्रीपद भूषवलेले धनंजय मुंडे यांना प्रशासकीय कामाची चांगली जाण आहे, तसेच ग्रामीण भागातील समस्यांचा देखील चांगला अभ्यास आहे. त्यांच्या जबाबदीचे प्रत्यंततर मंत्री झाल्यानंतर लगेचच दिसून आले. राज्यात बहुतांशी जिल्ह्यात अद्याप पाऊस दडी देऊन बसेलला असल्याने खरीप हंगाम लांबला असून शेतकरी राजा चिंतेत आहे, हंगाम वाया जाण्याची भिती त्यांना लागून राहिलेली असतानाच धनंजय मुंडे यांनी संवेदनशिलता दाखवत आपला वाढदिवस सार्वजनिक पद्धतीने साजरा न करण्याची घोषणा केली आहे.

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असून राज्यातील काही भागात पावसाने अजूनही दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी राजा चिंतेत आहे. पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडण्याचे लक्षण आहेत. शेतकऱ्यांच्या या संकटात आपण वाढदिवस साजरा करणार नाही अशी भूमिका राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. काल मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये धनंजय मुंडे यांना कृषीखाते मिळाले. कृषीखात्याची जबाबदरी मिळताच धनंजय मुंडे यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे.

याबाबत ची माहिती त्यांनी एका पत्रकातून दिली आहे. ‘माझ्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही खरीप हंगामातील पेरणीच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झाला नाही. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलेला असताना मी माझा वाढदिवस सार्वजनिक रित्या साजरा करणे संयुक्तिक नाही, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. आज होणारा (15 जुलै ) वाढदिवस सार्वजनिक रित्या साजरा करणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रक त्यांनी जाहीर केले आहे.

कृषीमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पण आता त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे ट्वीट करत सांगितले आहे. जनतेचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत कायम आहेत, परंतु पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत यावर्षी मी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करत करण्याचा निर्णय घेतला आहे. असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा:

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, ऋतुराज गायकवाडच्या हाती कर्णधारपदाची धुरा

अजित पवारांचे अर्थमंत्रीपद रोखण्यासाठी शिंदेगट दिल्लीत – संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिकमध्ये स्वागत होताच आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केला पाठिंबा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी