31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, 'दमच निघत नाही'

मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, ‘दमच निघत नाही’

राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबाबत मराठा समाज लाखोंच्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्च्याला आपली उपस्थिती दाखवत आहे. एवढंच नाही तर जरांगे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी येथे ओबीसी वर्गातून जातप्रमाणपत्र मिळावे यासाठी मागणी केली असून  त्यांनी उपोषणही केले होते. तर दुसऱ्या बाजूला आता धनगर समाज आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहू असे सांगितले. तर आदिवासी, कोळी, लिंगायत यांची देखील आरक्षणासाठी मागणी सातत्याने होत आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत मौन सोडले.

राज्यात काही दिवसांपासून आरक्षणाचे धुमशान सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील ही सभा घेत सरकारवर बरसत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी उपोषणही केले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. हे उपोषण सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी स्वतः जरांगे-पाटील यांना रस देऊन उपोषण सोडायला सांगितले. त्यानंतर काही दिवस होऊनही सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याचे पाहायला मिळते. यावर आता अजित पवार यांनी ‘मराठा आरक्षण मिळणार पण दमच निघत नाही’, असे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा 

समलैंगिक विवाहाला ‘सर्वोच्च’ मान्यता नाहीच, संसदीय कायदेमंडळाचा अधिकार

आमदार अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल कोसळला, आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण

 

अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पारणेर येथे मोहटा देवीच्या उत्सवासाठी गेले होते. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यांनी आरक्षणावरून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. आता धनगर, ओबीसी, भटके, आदिवासी समाजाचे नागरिक देखील आरक्षणाची मागणी करू लागलेत. मराठा समाजाला इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आरक्षण द्यायचे आहे. मात्र कुणी समजून घेत नाहीत. आरक्षणाच्या मुद्यावर काहीजण टोकाची भूमिका घेतात, असे अजित पवार म्हणाले आहेत.

आपल्या राज्याला शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभला आहे. त्याचप्रमाणे राज्याचा कारभार सुरू आहे. सर्वच आरक्षणाची मागणी करत आहेत. ही मागणी करत असताना वातावरण खराब होऊ देऊ नका. धनगर, मराठा, आदिवासी हे आपापल्या भूमिका बजावत आहेत. यामुळे जातीजातीत भांडणे होत आहेत टी भांडणे होऊ नये, ती कोणालाच नको आहेत, असे वक्तव्य अजित पवारांनी पारणेर येथे केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी