27 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल कोसळला, आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल कोसळला, आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण

भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात विकासाच्या मुद्द्यावरून अनेकदा बोलत आहेत. मग तो शहरांचा विकास असो की गावांचा भाजप सरकारच्या काळात मेट्रो सुविधा सुरू करण्यात आली होती. डिजिटल भारताचा पायंडा रोवला. अनेक वर्षांपासून राज्य सरकार काम करत आहे. काही वर्षांपासून रखडलेला कोकणातील रस्त्याचा मुद्दा आता सरकार मार्गी लावत आहे. दरम्यान, ९ ते १० महिन्यांपासून चिपळूण येथे बहादूर शेख नाक्यावरील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम सुरू होते. सर्वाधिक मोठा चौपदरी महामार्ग आणि पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे बांधकाम करत असताना काही भाग आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पडला आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे मंत्री रवींद्र चव्हाण लवकर 4 वाजता पाहणी करण्यासाठी चिपळूणला रवाना होणार आहेत.

कोकणातील सर्वात मोठ्या महामार्गाचे काम सध्या चिपळूण येथे सुरू आहे. बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालय असा १.८१ कि.मी. इतकी पुलाची लांबी आहे. तर या पुलासाठी ४६ पिलर्स बनवण्यात आले आहेत. वाशिष्ठी नदीनंतर या पुलाची सुरूवात होते. काही महिन्यांपासूनच या पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. पिलर्सचे बांधकाम झाल्यानंतर पिलर्सवर गर्डर चढवण्याचे काम सुरु आहे. यावेळी आज सकाळी ८ वाजल्याच्या सुमारास पुलाला तडा गेला. तर दुपारी २.४५ वाजता पुलाचा काही भाग पडला आहे. यामुळे आता बहादूर शेख नाक्यावर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे या भागात भयावह वातावरण झाले आहे. जीवितहानी न झाल्याची बाब सकारात्मक आहे.

हेही वाचा

अंबाबाईचा नवरात्रोत्सव ‘लय भारी’

दिवाळीत राजकीय धमाका, शिंदे गटाच्या नेत्याकडून मोठा दावा

गर्व से कहो हम हिंदू हैं, म्हणणारी शिवसेना आता.. डॉ. आशिष शेलारांचे ट्वीट

आता या घडलेल्या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यभरातून आता भाजप सरकारवर विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे. यावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणालेत की, मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी