31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमुंबईPotraj : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही 'पोतराज' मुंबईच्या रस्त्यांवर मागून खातो

Potraj : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ‘पोतराज’ मुंबईच्या रस्त्यांवर मागून खातो

कमरेभोवती कपडयांची लक्तरे बांधून, पाठीवर चाबकाचे फटके मारणारा पोतराज (Potraj )पाहिला की पावलं आपोआप थांबतात. क्षणभर का होईना आपण त्याच्याकडे वळून पाहतो.

कमरेभोवती कपडयांची लक्तरे बांधून, पाठीवर चाबकाचे फटके मारणारा पोतराज (Potraj )पाहिला की पावलं आपोआप थांबतात. क्षणभर का होईना आपण त्याच्याकडे वळून पाहतो. गेल्या कित्येक पिढया आपण पोतराज पाहत आलो आहोत. भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली, तरी देखील पोतराजाला अंगावर चाबकाचे फटके मारुन लोकांकडे पैसे मागून आपला संसार चालवावा लागतो. हे गोष्टी फार गंभीर आहे. दक्ष‍िण मुंबईतील सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या लोकवस्तीमध्ये रस्त्यांवर तुम्हाला पोतराज उभा असलेला द‍िसेल. पोतराजाची पत्नी छोटीशी ढोलकी वाजवत असते. कंबरेला कपडयाच्या झोळीत लहागं लेकरु असतं.

एखाद दोन लेकरं आजूबाजूला हिंडत असतात. मुंबईच्या हुतात्मा चौक परिसरात, मुंबई उच्च न्यायालय परिसरात, चर्चगेट रेल्वेस्टेशन‍, छ. शिवाजी महाराज टर्मिनल परिरात देखील पोतराज आपल्या नजरेस पडतो. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंकडे पैसे मागतो. कोणी स्वखुशीने दिले तर घेतो. नाहीतर विनवणी करत त्यांच्या मागे मागे जातो. एकाने नाही दिले तर लगेच दुसऱ्याकडे याचना करतो. हे सगळं पाहून एक प्रश्न मनात निर्माण होतो. हेच का ते ‘ अच्छे दिन’ आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. मगा पोतराज अजून परंपरेच्या जोखडातून का? स्वतंत्र झाला नाही. त्याला अजूनही मागून का? खावे लागते. यांच्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी कोणतेही नियोजन केलेले नाही. कोणत्याही योजना आमलात आणल्या नाहीत.

केंद्रसरकार प्रमाणे राज्य सरकार देखील या गोष्टींना जबाबदार आहे. आपल्या देशात 75 वर्षांमध्ये अनेक मुख्यमंत्री झाले. अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली. मग या भटकणाऱ्या लोकांसाठी त्यांनी काय केले हाच खरा प्रश्न आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लोकांना असे जीवन जगावे लागते आहे. राज्याची सर्व उच्चस्तरीय यंत्रणा याच परिसरात आहे. मंत्रालय देखील याच परिसरात हाकेच्या अंतरावर आहे. मग लाल दिव्याच्या गाडीतून जाणाऱ्या कोणत्याही लोकप्रनिधींना, तसेच उच्च पदस्थ आधिकाऱ्यांना पोतराजासारखी मागून खाणारी माणसं कशी दिसत नाहीत? की मोठया मोठया शहरात छोटी छोटी बाते होती है! ही भूमीका घेऊन राज्यकर्ते आणि करव‍िते सोईस्करपणे डोळे झाक करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Viral Audio Clip : किमान तीनशे रुपये तरी द्या, मंत्री भूमरेंच्या सभेआधीच ऑडिओ क्लीप जोरात

Asia Cup 2022 : आशिया चषकात पुन्हा श्रीलंकेची बाजी, पाकिस्तानची पुरती जिरली

Officer : प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे खूप मोठी ताकद असते – डॉ. सचिन मोटे

तसेच या शहरात अनेक सामाजिक संस्था आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील या गोष्टी दिसत नाहीत याचे देखील आश्चर्य वाटते. कारण या महानगरांमध्ये केवळ फंड जमा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. हे करत असतांना त्यांनी मानवता देखील जपणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती मुळ प्रवाहात येणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. केवळ आपल्याकडील चारचाकी गाडीने जातांना काही तरी वेगळं दिसतंय म्हणून कुतूहलाने बघतांना किंवा कोण तरी गरीब बिचारा मागतोय हे बघून नाकं मुरडण्‍यापेक्षा माणूस म्हणून विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी ही गोष्ट नक्कीच भूषणावह नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी