29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयआज महाराष्ट्रात ईडी नावाचे नवे देवस्थान; अमोल कोल्हे यांचा येवल्यातून घणाघात

आज महाराष्ट्रात ईडी नावाचे नवे देवस्थान; अमोल कोल्हे यांचा येवल्यातून घणाघात

काही लोक म्हणतात पांडूरंगाला बडव्यांनी घेरले आहे, पण त्यांना वारकरी परंपरा माहिती नाही. ज्याला वारीला जाता आले नाही तो वारीला जो वारकरी गेला त्याच्या पाया पडणे ही परंपरा वारकरी सांप्रदायाची आहे. नऊ वर्षे झाली केंद्रातील सरकारला सत्तेत येऊन पण महागाईची जाणीव सरकारला झाली का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट झाले का? जनता जागा दाखवेल म्हणून मनातील शकुणी जागा झाला, म्हणून ही परिस्थिती आल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली. येवल्यातील सभेत ते बोलत होते.

केरळ, तामिळनाडू, बिहार, आंध्र, राजस्थान अशा राज्यात भाजपला हद्दपार करायला लागले आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या खालोखाल सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात अशी परिस्थीती निर्मान केली जात आहे. जाणारे आवर्जून सांगतात विकासासाठी गेलो, याविकासाने कांद्याला भाव मिळणार आहे का, महागाई कमी होणार आहे का? आज महाराष्ट्रात ईडी नावाचे नवे देवस्थान जन्माला आले आहे, तिथून कोणी जावून आले की, विकासासाठी गेलो असे सांगतात. हा महाराष्ट्र वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेध्यांचा आहे. शिवरायांनी दिल्लीत स्वाभिमान दाखवला.

हे सुध्दा वाचा:

‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’! म्हणत शरद पवारांनी केली नव्या इनिंगची सुरुवात

शरद पवार यांचे मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

…तर मी राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

येताना मुंबईहून निघालो तेव्हा अनेकांच्या पवारांवर नजरा रोखल्या होत्या, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अप्रुप होतं, स्वाभिमान होता. माझ्या हक्कासाठी माझा बाप मैदानात लढतो आहे. शेवटी एवढेच सांगतो ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. ”चार चौघांसारखा न ठेवला मी बाझ माझा. आदळे लालित्य माझे वेगळा बाज माझा”, ही कविता त्यांनी सादर केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी