32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयशिंदे गटाचे आमदार अनिल बाबर याचं आकस्मित निधन

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर याचं आकस्मित निधन

शिवसेनेची गेली अनेक वर्षांपासून निष्ठा ठेवत आपल्या कार्याचा ठसा उमटवत अमिल बाबर यांनी आपल्या विभागाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला. अनिल बाबर (Anil babar) हे सध्या शिंदे गटामध्ये कार्यरत होते. खानापरू-आटपाडी या मतदारसंघाचे ते आमदार असून त्यांचं ७४ व्या वर्षा आकस्मित निधन झालं आहे. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं दुपारी सांगण्यात आलं. सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या चढच त्यांनी आमदारकीपर्यंत धाव घेतली आहे. मात्र काही वर्षांआधी शिवसेना फुटीनंतर शिंदे गटामध्ये सहभागी झाले. (Anil babar death)

७ जानेवारी १९५० साली अनिल बाबर यांचा जन्म आहे. त्यांची राजकीय कारकिर्द देखील तितकीच मोठी आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी राजकारणामध्ये आपलं पाऊल ठेवलं आहे. तसेच १९९० साली आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण तयार केली आहे. १९८२ ते १९९० खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं.

हे ही वाचा

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण मिळवून देणार – मनोज जरांगे – पाटील

पुष्कर जोगचं ‘ते’ विधान आणि मनोरंजन क्षेत्रातून संतापाची लाट

एकनाथ शिंदे आणि अनिल बाबर विश्वासू

१९९९ मध्ये ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले होते. तर २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकल्या. आमदार एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू होते. सांगली गटातील शिंदे गटातील एकमेव आमदार होते. त्यांच्या आकाली जाण्याच्या निधनाच्या बातमीनं राज्यातील राजकीय वर्तुळात आणि आटपाडी-खानापूर मतदारसंघामध्ये पायाखालची जमिन सरकली आहे.

अनिल बाबर पाणीदार आमदार

गेल्या काही वर्षांपासून आटपाडी-खानापूरमध्ये विभागामध्ये दुष्काळ भाग असल्यानं पाण्याची बोंबाबोंब पाहायला मिळत होती. या मतदारसंघामध्ये दुष्काळाचा शाप आहे. याभागामध्ये जायकवाडी प्रकल्पातून पाणी आणता येईल यासाठी ते सदैव तत्पर राहिले आहेत. आमदार म्हणून अनिल बाबर यांची ओळख पाणीदार आमदार म्हणून आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची मदत घेऊन प्रयत्न केले आहेत.

शासकिय ईतमामातून अंत्यसंस्कार

अनिल बाबर यांच्या जाण्यानं शासकीय ईतमामातून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी थेट ट्विट करत दिली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी