32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयछगन भुजबळ यांनी दिला राजीनामा? अजित पवार गटाच्या नेत्यानं दिला दुजोरा

छगन भुजबळ यांनी दिला राजीनामा? अजित पवार गटाच्या नेत्यानं दिला दुजोरा

अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार गटाच्या एका नेत्यानं याबाबत दुजोरा दिला आहे. यामुळे सध्या छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या केवळ चर्चा आहेत. मात्र अजूनही तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला नसल्याचं बोललं जातंय. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत (Obc Reservation) आता कोणतीही तडजोड करता येणार नाही. आरक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत. ओबीसींच्या हिताचं संरक्षण करणार असल्याचं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यानं आता याबाबत एक मोठी माहिती समोर आणली आहे. छगन भुजबळ यांनी काही महिन्यांआधी म्हणजेच २७ नोव्हेंबरला राजीनामा पत्र दिल्याचं म्हटलं आहे. अंबडच्या एका सभेआगोदर हे पत्र दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी हे पत्र स्विकारलं नसल्यानं भुजबळांचं मंत्रीपद अजूनही सुरक्षित आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्यापद्धतीने सरकारने आपली ताकद पणाला लावली आहे हे पाहुन भुजबळ नाराज असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून माहिती समोर आली आहे.  २७ जानेवारीला कुणबी जातप्रमाणपत्र वाटप केलं जाणार असल्याचं म्हटलं गेलं, यावर ही मागच्या दाराने ओबीसी आरक्षणामध्ये एंट्री केली असल्याचं ते म्हणाले.

हे ही वाचा

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर याचं आकस्मित निधन

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघडीकडून हिरवा कंदील

राजीनामा स्विकारू शकतात

छगन भुजबळ यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आहे मात्र तो राजीनामा अजूनही एकनाथ शिंदे यांनी स्विकारला नाही. मात्र सध्या मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनासाठी सराकार काम करत आहे, मात्र त्यामध्ये छगन भुजबळ हे आडकाठी आणत आहेत, म्हणून एकनाथ शिंदे यांना त्याची अडचण होत आहे, म्हणून एकनाथ शिंदे त्यांचा राजीनामा घेऊ शकतात, अशी माहिती अजित पवार गटाच्या नेत्यानं सांगितली असून त्यांनी आपलं नाव न सांगण्याबाबत अट घातली आहे.

अशातच एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सध्या एकनाथ शिंदे करत आहेत. तर याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील यासाठी विचार करताना दिसत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी