31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमंत्रीमंडळात अशोक चव्हाण यांचा समावेश होणार, पृथ्वीराज चव्हाणांवर मात्र टांगती तलवार

मंत्रीमंडळात अशोक चव्हाण यांचा समावेश होणार, पृथ्वीराज चव्हाणांवर मात्र टांगती तलवार

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : येत्या दोन – तीन दिवसांत राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून त्यांच्या कोट्यातील संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत अशोक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश करण्याबाबत पक्षश्रेष्ठी उत्सुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सध्या नवी दिल्लीमध्ये आहेत. मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल व वेणूगोपाल यांच्याशी त्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये अशोक चव्हाण यांच्या समावेशाबाबत वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत. अशातच मंत्रीमंडळात काँग्रेसच्या वाट्याला आलेले महसूल हे महत्वाचे खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी महत्वाचे खाते उरत नाही. त्यांच्या ज्येष्ठत्वाला साजेसे असे खाते काँग्रेसकडे उपलब्ध नाही. परंतु अशोक चव्हाण मंत्रीमंडळात येण्यासाठी आग्रही आहेत. पीडब्ल्यूडी किंवा ऊर्जा या दोन्हींपैकी कोणत्याही खात्याचे मंत्रीपद स्वीकारण्याची अशोक चव्हाण यांची तयारी आहे. त्यामुळे त्यांना या दोन्हीपैकी एका खात्याचे मंत्रीपद मिळू शकते.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाबाबत मात्र अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. बाळासाहेब थोरात यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट झालेली नाही. या भेटीनंतरच काँग्रेसच्या वाट्यातील मंत्र्यांची नावे निश्चित होतील, तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतही निर्णय होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरांताचा टोला : भाजपने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले होते, आम्ही मात्र सन्मानाने कर्जमाफी देणार

शरद पवारांच्या गनिमी काव्याने ‘शेतकरी कर्जमाफी’, आक्रस्ताळ्या भाजपची मात्र फजिती

अजित पवारांच्या मंत्रीपदाबद्दल संजय राऊत बोलू शकत नाहीत, मी पक्षाचा अध्यक्ष आहे : शरद पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी