27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक; काँग्रेसचा हल्लाबोल

मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक; काँग्रेसचा हल्लाबोल

वेदांदा-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याच्या तळेगावमध्ये प्रस्तावित होता. 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर गुजरातला नेण्यात आला होता. पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. वेदांदा-फॉक्सकॉन हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती. पण महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. आता हा प्रकल्प तिथेही होत नसल्यामुळे महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन हा महत्वाचा प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातून पळवून नेला. तब्बल 1.5 लाख कोटी रुपये गुंतवणुक व 1 लाख नोकऱ्या निर्माण करणारा हा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पुणे परिसरातील वातावरण अनुकुल आहे. पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. या प्रकल्पासाठी द्यावयाच्या सुविधा व सवलतीसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती पण हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. गुजरातमध्ये ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करणार होते. त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणे अशक्यच होते, आणि शेवटी तेच झाले. हा प्रकल्प गेल्यामुळे देशाचे तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे सुध्दा वाचा:

दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम शरद पवारांनी केलं – सदाभाऊ खोत यांची टीका

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठली !

उद्योग निघून जाणे विकासाच्या दृष्टीने चांगले नाही

वेदांता आणि तैवानची बलाढ्य कंपनी फॉक्सकॉन संयुक्तीकरित्या हा प्रकल्प उभा करणार होते. पण आत्ता फॉक्सकॉनने वेदांसोबतच्या करारातून माघार घेतली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांच्या परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊन भारताचे नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रातून याआधी वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क केमीकल्स यासह अनेक उद्योग व संस्था महाराष्ट्राबाहेर गेल्या त्याला भाजपा, फडणवीस हेच जबाबदार आहेत. असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात पण देशातून जाणारे उद्योग मात्र थांबवू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे. सरकार कोणाचेही असो उद्योग निघून जाणे विकासाच्या दृष्टीने चांगले नाही, असेही लोंढे म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी