33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन तेंडुलकरांसाठी बच्चू कडूंची भीकपेटी

सचिन तेंडुलकरांसाठी बच्चू कडूंची भीकपेटी

अपक्ष आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती बंद कराव्यात, यासाठी बच्चू कडू यांनी आता वेगळीच युक्ती केली आहे. त्यांनी चक्क गणपती मंडळासमोर भीकपेटी ठेवली असून त्यात जमलेले पैसे सचिन तेंडुलकर यांच्या घरी पोहोचवणार आहेत.

बच्चू कडू यांनी 31 ऑगस्ट रोजी सचिन तेंडुलकर यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले होते. सचिन तेंडुलकर ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याबद्दल बच्चू कडूंनी निषेध व्यक्त केला होता. एवढेच नाही तर सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत, त्यामुळे त्यांनी अशा जाहिराती करू नयेत, असे आवाहनही केले होते. त्यासाठी त्यांनी 30 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. अखेर 31 ऑगस्ट रोजी त्यांनी तेंडुलकर यांच्याविरोधात त्यांच्या घराबाहेर आंदोलन केले होते. त्यावेळी बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकर यांना नोटीसही पाठवल्याची माहितीही दिली होती. दरम्यान, या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतरही बच्च कडू त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

आता बच्चू कडू हे आंदोलन वेगळ्या मार्गाने पुढे नेत आहेत. 23 सप्टेंबर रोजी त्यांनी एक ट्वीट केले. त्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या गावात सत्यपाल महाराजांचे किर्तन झाले. त्यावेळी बेलोरा येथे सचिन तेंडुलकर यांच्यासाठी भीकपेटी ठेवण्यात आली आहे सत्यपाल महाराजांनी स्वतः तेंडुलकरांसाठी दान दिले. तसेच कीर्तनातून ऑनलाईन जुगार जाहिरातीला विरोध करण्याचंही शब्द त्यांनी दिला, अशी माहिती बच्चू कडूंनी दिली आहे.

हे कमी म्हणून की काय, सोलापूर येथे गणपती मंडळासमोर भीकपेटी ठेवली असून सचिन तेंडुलकरांनी जुगाराची जाहिरात बंद करण्यासाठी ही भीकपेटी ठेवल्याचं त्यांनी ट्वीट केले आहे. शिवाय या भीकपेटीत जमलेली भीक तेंडुलकर यांच्या घरी पोहोचवणार असल्याचेही बच्चू कडूं यांनी स्पष्ट केले आहे.

सचिन तेंडुलकर हे महान क्रिकेटपटू आहेत. त्यांना भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. अशी व्यक्ती ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती का करत आहेत? भारतरत्नचे मानकरी असलेल्या सचिन तेंडुलकरांनी अशा जाहिराती केल्यामुळे त्यांना मानणाऱ्या तरुणाईवर चुकीचा परिणाम होतो, असा बच्चू कडू यांचा दावा आहे.

अजित पवार गटांकडून ऑफर्स येत आहेत; एकनाथ खडसे यांचा दावा

पत्रकारांसाठी भाजपचं ‘चहापाणी’ तंत्र

कोण पात्र, कोण अपात्र, सुनावणी १३ ऑक्टोबरला

एकूणच बच्चू कडू सचिन तेंडुलकर यांच्या ऑनलाईन गेमिंग जाहिरातीविरोधात खूप आक्रमक झालेत. आता ते भीकपेटीतील पैसे कधी सचिन तेंडुलकर यांना पाठवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी