26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनसलमान-शाहरुखची बाप्पाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी

सलमान-शाहरुखची बाप्पाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी

देशभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. आबालवृद्धांचा लाडका उत्सव असलेल्या या गणेशोत्सवात सामान्य लोकांपासून ते राजकीय नेते, बॉलीवुड सेलिब्रिटीज यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती उत्सवादरम्यान नातेवाईक. मित्र परिवाराच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. अनेक मोठमोठे राजकीय नेते तसेच बॉलीवुड कलाकार ही प्रथा जोपासताना दिसतात. अश्यातच अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी रविवारी (24 सप्टेंबर) रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बॉलीवूडच्या करण अर्जुन जोडीने भेट दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि लाडका भाईजान सलमान खान हे दोघेही मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी गणपती पूजेसाठी पोहोचले होते. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत या दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शाहरुख – सलमानच्या एकत्र येण्याने दोघांच्याही चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या या भेटीचे व्हिडीओज सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत असून विविध फॅन पेजेस आणि पापाराझी अकाऊंटवर ते पोस्ट करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


यावेळी, सलमान खान त्याची बहीण अर्पिता खान शर्मा आणि मेहुणा आयुष शर्मा यांच्या सोबत पोहोचला होता. यावेळी पारंपरिक वेशभूषा करत सलमान खानने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

तर, शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत ‘वर्षा’ वर उपस्थित होता. यावेळी शाहरुखने निळ्या रंगाचा पठानी सूट परिधान केला होता.


या दोघांव्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांच्या घरी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यांमध्ये आशा भोसले, जॅकी श्रॉफ, बोनी कपूर, अमीषा पटेल, अर्जुन रामपाल यांचाही समावेश होता.

हे ही वाचा 

बोहल्यावर चढली अन् परिणीती चोप्राची चढ्ढा झाली

3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

अरिजितच्या आवाजातील ‘आशिकी 3’ चे गाणे लिक, सोशल मिडियावर झाले वायरल!

करण अर्जुन चित्रपटात एकत्र झळकलेली शाहरुख खान आणि सलमान खान यांची सुपरहिट जोडी पठाण चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली होती. आता पुन्हा एकदा ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटातून हे दोघे एकत्र ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहेत. ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार असून सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मार्च 2024 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी