30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयभाजप सरकारच्या काळातील ‘हा’ शैक्षणिक निर्णय बाळासाहेब थोरातांनी केला रद्द

भाजप सरकारच्या काळातील ‘हा’ शैक्षणिक निर्णय बाळासाहेब थोरातांनी केला रद्द

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विविध योजनांचा पुनर्विचार करण्याचा सपाटाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावला आहे. अशातच शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही फडणवीस सरकारच्या काळातील एक निर्णय रद्दबातल करून आणखी एक धक्का दिला आहे.

भाजप सरकारच्या काळात शिक्षण विभागामार्फत विविध ३३ अभ्यास गट नेमण्यात आले होते. हे सगळे अभ्यास गट रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शिक्षणमंत्री थोरात यांनी विधानपरिषदेमध्ये केली. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर थोरात यांनी हा निर्णय जाहीर केला.

प्रती विद्यार्थी या निकषानुसार शाळांना वेतन अनुदान देण्याबाबत व अन्य मुद्द्यांबाबत अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी हे ३३ अभ्यास गट स्थापन केले होते. राज्यातील टप्पा अनुदानावर असलेल्या तसेच विना अनुदानित शाळा, तुकड्या व अतिरिक्त शाखांना अनुदान देण्याबाबतच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी हे अभ्यास गट नेमले होते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शिक्षक वेतनाऐवजी प्रती विद्यार्थी अनुदान देणे आदी बाबींवर या अभ्यास गटामार्फत निर्णय घेण्यात येणार होते. परंतु शिक्षक व लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेऊन अभ्यास गटांचा निर्णय रद्द करण्यात येत असल्याचे थोरात यांनी सभागृहात सांगितले.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचले : काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचा बाळासाहेबांना शब्द दिला होता का ?

भीमथडी जत्रेत पुणेकरांच्या भेटीला विठूराया

VIDEO : रोहित पवारांचे विधानसभेत पहिलेच भाषण, भाजपवर केला हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सुद्धा अंगावर धावून जायचो

उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी