30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांनी केले भाजपाला लक्ष्य! म्हणाले, देशाच्या एकात्मतेला बंधुभावाला नख लावण्याचे काम...

बाळासाहेब थोरातांनी केले भाजपाला लक्ष्य! म्हणाले, देशाच्या एकात्मतेला बंधुभावाला नख लावण्याचे काम सुरु

टीम लय भारी

नाशिक:- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकच्या इगतपुरी येथे मुंबई काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आलेल्या  प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. देशातील विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून समाजात जाती धर्माच्या नावाने फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. देशाच्या एकात्मतेला बंधुभावाला नख लावण्याचे काम सुरु आहे. हा विखारी प्रकार थांबवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले.( Balasaheb Thorat targets BJP)

राज्यात काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे, हाच संविधानाचा विचार आहे. पण देशातील विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेसचा विचार पुन्हा पोहोचवण्याची आवश्यकता आहे.

हे सुद्धा वाचा

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले

बाळासाहेब थोरातांच्या दुरदृष्टीतून साकारला ई- पीक पाणी प्रकल्प, राजस्थान सरकारनेही घेतला आदर्श

राज्यात लवकरच वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

830 bungalows built in Madh Island by forging maps: Balasaheb Thorat

महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना महामारी आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदत केली आहे. त्यामुळे विधानपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे, असे देखील थोरात यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे व काँग्रेसची सर्वसमावेशक भुमिका याला लोकांचा पाठिंबा आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून आपली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल याची खात्री आहे, असे देखील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

इगतपुरी येथे मुंबई काँग्रेस आयोजित प्रशिक्षण शिबिराला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरण सिंग सप्रा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, सोनल दत्ता यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी