27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमहिला आणि पुरुष थोडा फरक येतो; अदिती तटकरें विषयी बोलताना भरत...

महिला आणि पुरुष थोडा फरक येतो; अदिती तटकरें विषयी बोलताना भरत गोगावले यांचे महिलांबाबत आपमानस्पद विधान

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचे घोडे आता आणखी अडले आहे. अजित पवार सरकारमध्ये आल्यामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झाले आहेत. त्यातच गेले वर्षभर मंत्रीपदासाठी डोळे लावून बसलेले आमदार भरत गोगावले यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांचे आव्हान उभे राहिल्याने त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. अदिती तटकरे यांच्याबाबत प्रतिक्रीया देताना आज गोगावले यांची जीभ घसरली त्यांनी महिलांचा अपमान होईल असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यासमोर आता आणखी अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.

आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांना रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रश्न विचारला असता भरत गोगावले म्हणाले की, ‘ मग पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? आम्ही त्यांच्या पेक्षा ( अदिती तटकरे ) चांगल काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना’. असे विधान केले आहे. तसेच मला 15 वर्षांचा अंदारकीचा अनुभव आहे. रायगडमधील आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे असे ही त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा:

जिल्हे पिंजून काढा ! पडझड झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे मिशन

समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा; हेलिकॉप्टरने अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणार

शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळू शकते, शिंदेंसोबतच्या आमदाराचा खळबळजनक दावा

भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदावर अनेक वर्षांपासून दावा करत आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रायगडचे पालकमंत्री पद आपल्याच पदरात पडेल अशी त्यांना खात्री आहे. पण आता अजित पवारांसोबत अदिती तटकरे सत्तेत आल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा पालकमंत्री पदासाठी होत आहे. अदिती तटकरे यांच्या विषयी केलेल्या या विधानामुळे आता मंत्रीमंडळ विस्तारपूर्वी नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी