32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींवर 'मोदी पेढेवाले' टीका करणा-यांना भाजपात मांडीवर बसवतात

पंतप्रधान मोदींवर ‘मोदी पेढेवाले’ टीका करणा-यांना भाजपात मांडीवर बसवतात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘मोदी पेढेवाले’ अशी टीका करणा-या सातारकरांना भाजपवाले मांडीवर बसवतात. त्यांना मोदी कळले का? असा सवाल शिवसेना संजय राऊत यांनी भाजपला विचारला.

मोदींवर टीका करणा-यांना भाजपात महत्वाची पद दिली जातात. त्यांना मांडीवर बसवलं जातातं. महत्वाचीं पदे दिली जातात असा रोखठोक सवाल राऊत यांनी भाजपला विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामध्ये पूर्वीपासूनच अत्यंत चांगले संबंध आहेत. आम्ही मोदींचा नेहमीच सन्मान करतो आणि करत राहू. नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये कुणी तरी दुरावा निर्णाण करतोय, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता.

राऊत  यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला होता. त्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वाथी की नि:स्वार्थी; असा सवाल शिवसेनेला केला होता. त्यानंतर आज राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी