29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमी माझ्या पक्षाचा आदेश अंतिम मानते; पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस प्रवेशाचा मुद्दा...

मी माझ्या पक्षाचा आदेश अंतिम मानते; पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस प्रवेशाचा मुद्दा फेटाळला

माजी आमदार, मंत्री पंकजा मुंडे या भाजपा सोडून काँग्रेसमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती, पण या चर्चांना आज पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे, मी 20 वर्ष भाजपात, राजकारणात काम करत आहे. मी माझ्या पक्षाचा आदेश अंतिम मानते. मी माझ्या पक्षाच्या विरोधात काय केलंय, ज्यामुळे माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण केला? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षप्रवेशाबाबतचे वृत्त  फेटाळले, शिवाय कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत कुठलेही ट्वीट किंवा सार्वजनिक रित्या कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. माझ्या सभेमध्ये होणाऱ्या भाषणाचे तुकडे काढून त्याचे चुकीचे अर्थ लावले जात आहेत. माझा कुठल्याही नेत्याशी पक्ष प्रवेशाबद्दल संवाद झालेला नाही, असे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. मी नाराज आहे आणि पक्षाच्या बाहेर जाणार अशी चर्चा होत आहे. भाजपा सोडून कुठेही जाणार नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटलेली नाही, माध्यमांमध्ये ही चुकीची बातमी दाखवली जात आहे. ही बातमी दाखवणाऱ्या चॅनलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे, आणि न्यायालयात लढाई लढणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

मी माझ्या पक्षाचा आदेश अंतिम मानते. मी माझ्या पक्षाच्या विरोधात काय केलंय ज्यामुळे माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण केला? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मी 20 वर्ष राजकारणात काम करत आहे. हे काम करताना माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण होत असेल तर ते माझ्यासाठी अत्यंत दु:खद आहे. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच 20 वर्षापासून राजकारण करत आहे आणि अजूनपर्यंत एकही सुट्टी घेतली नाही. मला राजकारणाचा कंटाळा आला असल्यामुळे 2 महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे असे सांगितले.

हे सुद्धा वाचा:

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; अधिवेशन फक्त 15 दिवसाचे

क्रिकेटचा बादशहा महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशावर चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर स्पष्टीकरण देत म्हणाल्या की, राजकारण करणे, नाही करणे, कुणाशी आणि कधी करायचे हा वेगळा प्रश्न आहे. पण राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतली, मी काही दिवसांपूर्वी मीडियाला ही सांगितले होते माझी भूमिका मी स्वत: सांगेल आणि मला काही करायचे असेल तर ते ‘मी डंके की चोटपे’ करेन. माझ्या प्रवास आत्तापर्यंत पारदर्शक आहे. मला लपून छपून काम करणे पटत नाही. ज्या दिवशी मला माझ्या राजकारणात चुकीची गोष्ट करावी लागेल, माझ्या विचारसरणीसोबत प्रतारणा करावी लागेल, त्या दिवाशी मी राजकारण सोडायला मागे पुढे बघणार नाही. असे त्या म्हणाल्या. तसेच अनेक पक्षांकडून मला पक्षात येण्याच्या ऑफर येत आहेत असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी