31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeव्हिडीओशिवसेने कडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी

शिवसेने कडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी

उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून  लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम  लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर  यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती.

उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे(Ravindra Waikar is nominated from Shiv Sena). मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून  लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम  लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर  यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. वायकरांच्या उमेदवारीला मित्र पक्षातील काही जणांकडून विरोध हि होत होता. पण आता अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारे ठाकरे गटाचे शेवटचे आमदार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर  असा सामना पाहायला मिळणार आहे . रविंद्र वायकर हे महिन्याभरापूर्वीच शिंदे गटात सामील झाले होते.  उद्धव ठाकरे गटात असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी