33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयभाजपची 'निवडणूक' आघाडी, राजस्थान, मध्य प्रदेशमधील उमेदवारांच्या याद्या जाहीर

भाजपची ‘निवडणूक’ आघाडी, राजस्थान, मध्य प्रदेशमधील उमेदवारांच्या याद्या जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (९ ऑक्टोबर) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर भाजपने तातडीने मोठी भूमिका बजावली आहे. भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर राजकीय पक्षांकडून अजून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना भाजपने चक्क उमेदवारांची यादी जाहीर करत निवडणुकीत पहिली आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज निवडणूक आयोगाची घोषणा केली. ७ नोव्हेंबरपासून मतदान सुरू होत असून ३ डिसेंबरला पाचही राज्यामध्ये मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकांचे बिगुल वाजले असून उमेदवार जाहीर करण्यात भाजपने बाजी मारली आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता होती. त्यामुळे काही महिन्यांपासून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली होती. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांची तारीख जाहीर केल्यानंतर भाजपनेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी पहिल्या ४१ उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केलीय. विशेष म्हणजे यात सात खासदारांना आमदारकीचे तिकीट दिले आहे. नरेंद्र कुमार, राज्यवर्धन राठोड, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, डॉ. किरोडी लाल मीणा, भागीरथ चौधरी आणि देवजी पटेल या खासदारांना भाजपने आमदारकीची परीक्षा देण्यास सांगितले आहे.

इकडे मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ५७ मतदारसंघाच्या उमेदवारांचीही यादी भाजपने प्रसिद्ध केली आहे. तर छत्तीसगडमधील ९० जागांपैकी सर्वाधिक ६४ जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत.  इथेही भाजपने रेणुका सिंह, गोमती साय आणि अरूण साव या तीन खासदारांना आमदार बनवण्याचा निर्धार केला आहे. ५७ उमेदवारांच्या यादीत या तिन्ही खासदारांची नावे आहेत.

तेलंगणा (एकूण जागा–११९) आणि मिझोरम (एकूण जागा–४०) या राज्यांसाठी अजून भाजपने उमेदवारांची यादी घोषित केलेली नाही. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी ७ नोव्हेंबर मतदान होणार आहे. याच दिवशी मिझोरमध्येही मतदान आहे. छत्तीसगडमधील दुसऱ्या टप्प्यातील ७० जागांसाठी तसेच मध्य प्रदेशमधील सर्व जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान आहे. तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान आहे.

हे ही वाचा

५ राज्यांच्या ७ नोव्हेंबरपासून निवडणुका, आचारसंहिता लागू

४८ तासांनंतरही हेरंब कुलकर्णींवरील हल्लेखोर फरार, मुख्यमंत्र्यांकडून हेरंब यांची विचारपूस

टोलनाक्यांवरून राज ठाकरेंकडून फडणवीसांची ‘नाकाबंदी’

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी