31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय५ राज्यांच्या ७ नोव्हेंबरपासून निवडणुका, आचारसंहिता लागू

५ राज्यांच्या ७ नोव्हेंबरपासून निवडणुका, आचारसंहिता लागू

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक मोठी घोषणा केली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार असून याची सुरूवात ७ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. वरील पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून छत्तीसगमधील निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. तर पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकांचे रणशिंग फुंगले गेले आहेत. आता या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत होणार की स्थानिक पातळीवर निवडणुका होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

कोणत्या राज्याची कधी निवडणूक?

छत्तीसगड – एकूण जागा ९०
पहिला टप्प्या – २० जागांसाठी मतदान – ७ नोव्हेंबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर
अर्जांची तपासणी – २१ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर

दुसऱ्या टप्प्या – ७० जागांसाठी मतदान – १७ नोव्हेंबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर
अर्जांची तपासणी – ३१ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर


मिझोरम (एकूण जागा – ४०)
मतदानाची तारीख – ७ नोव्हेंबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर
अर्जांची तपासणी – २१ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर


मध्य प्रदेश (एकूण जागा – २३०)
मतदानाची तारीख – १७ नोव्हेंबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर
अर्जांची तपासणी – ३१ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर


राजस्थान (एकूण जागा – २००)
मतदानाची तारीख – २३ नोव्हेंबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर
अर्जांची तपासणी – ७ नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ९ नोव्हेंबर


तेलंगणा (एकूण जागा – ११९)
मतदानाची तारीख – ३० नोव्हेंबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर
अर्जांची तपासणी – १३ नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. पाच राज्यांमध्ये एकूण ८ कोटी २० लाख पुरुष मतदार आणि ७ कोटी ८० लाख महिला मतदार आहेत. तर एकूण ६० लाख २० हजार मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. शिवाय १ लाख ७७ हजार मतदान केंद्रे असतील आणि १ लाख १ हजार पोलिंग बूथवर वेबकास्टिंग सुविधा असेल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या निवडणुकींचा निवडणूक आयोग योग्यवेळी विचार करेल, असेही निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा

‘राष्ट्रवादी’ संदर्भात 13 ऑक्टोबरला ‘सर्वोच्च’ सुनावणी

४८ तासांनंतरही हेरंब कुलकर्णींवरील हल्लेखोर फरार, मुख्यमंत्र्यांकडून हेरंब यांची विचारपूस

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तिर्थक्षेत्रासाठी 287 कोटी !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी