33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप बहुमत सिध्द करुन दाखवणार : चंद्रकांत पाटील

भाजप बहुमत सिध्द करुन दाखवणार : चंद्रकांत पाटील

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं. उद्या बुधवारी भाजप विधीमंडळात बहुमत सिध्द करु दाखवेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरील विश्वासमताची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. लोकांना चांगलं सरकार मिळवण्याचा अधिकार आहे, असं मत न्यायमूर्ती रमन्ना यांनी मांडून महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा आदेश दिला. बहुमत चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, तसंच मतदान हे गुप्त पद्धतीनं नको, असंही न्यायालयानं सांगितलं. उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

भाजप आमदारांना ‘या’ ठिकाणी दिलं जाणार कानमंत्र

भाजपच्या हाती हंगामी विधानसभाध्यक्ष, अजितदादांचे हत्यार

‘महाविकास आघाडी 30 तासात नव्हे, 30 मिनिटांत बहुमत दाखवू शकते

मोठी बातमी : उद्या बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, घोडेबाजार रोखण्यासाठी निकाल

राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील : विधीमंडळ सचिव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी