31 C
Mumbai
Saturday, June 15, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप आमदारांना 'या' ठिकाणी दिलं जाणार कानमंत्र

भाजप आमदारांना ‘या’ ठिकाणी दिलं जाणार कानमंत्र

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सुप्रीम निर्णय दिला. 24 तासाच्या आत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. बुधवारी बहुमत सिध्द करून दाखवावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदारांना रात्री 9 वाजता वानखेडे स्टेडियमधील गरवारे क्लबमध्ये कानमंत्र दिले जाणार आहे.

भाजपच्या सर्व 105 आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व भाजप आमदारांची बैठक होणार आहे. त्यामुळे उद्या बुधवारी बहुमत सिध्द करुन दाखवावे लागणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनी, आम्हीच बहुमत सिध्द करु असे दावे करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आम्हीच बहुमत सिध्द करु असा दावा केला आहे. आमदारांच्या बैठकी बाबत दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात 24 तासाच्या आत बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी