31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरराजकीय'मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार का ?' याच मुद्द्यावरून निवडणुकीत समोर या, भाजपचे उद्धव...

‘मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार का ?’ याच मुद्द्यावरून निवडणुकीत समोर या, भाजपचे उद्धव ठाकरेंना आव्हान

नीती आयोग हे कुठल्याही गोष्टींची कार्यान्वय करणारी यंत्रणा नव्हे. नीती आयोग ही थिंक टँक आहे. नीती आयोग काहीतरी करणार आहे घडवणार आहे हा आरोपच मुळात मूर्खपणाचा आहे. या आयोगामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरून निवडणुकीत समोर या, असे थेट आव्हान भाजपचे उद्धव ठाकरेंना दिले आहे. नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशीष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला.

नीती आयोग सहकार्य आणि मार्गदर्शन करणार, संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार, ग्रोथ सेंटर एमएमआर असणार.. केंद्र सरकार त्यात निधी देणार, मुंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करते आहे, आम्ही केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि थेट विरोधकांना सांगतो याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्या समोर या… नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला.

जयंत पाटील यांचा मुंबईशी संबंध काय? मुंबईकरांशी लेन देन काय? जयंत पाटील यांचा अभ्यास कच्चा आहे आणि त्यांचे भाषण असत्य आहे. ज्या १०६ हुतात्म्यावर गोळीबार केले त्या काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने केले, त्या १०६ हुतात्म्यांच्या रक्ताचे हात काँग्रेसचे आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ते लागले आहेत, राष्ट्रवादी तेव्हा नव्हतीच. १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडण्याचे काम आणि पाप हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आज मला या ठिकाणी हेही स्पष्ट करायचे आहे अन्यथा मी बोललो नसतो तो माझा स्वभाव नाही.  असेही शेलार म्हणाले.

नीती आयोग हे कुठल्याही गोष्टींची कार्यान्वय करणारी यंत्रणा नव्हे. नीती आयोग ही थिंक टँक आहे. नीती आयोग काहीतरी करणार आहे घडवणार आहे हा आरोपच मुळात मूर्खपणाचा आहे. २०४७ पर्यंत भारत देश अमृतकाळ पूर्ण करेल तोपर्यंत कसा विकास झाला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व देशात सांगत आहेत, ते लाल किल्ल्यावरील भाषणातही बोलले होते. २०४७ पर्यंत भारताच्या विकासातील उद्दिष्ट ही शहराच्या विकासाशिवाय होऊ शकत नाही. कारण शहर ग्रोथ हब आहेत. शहराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. म्हणून नीती आयोग थिंक टँक म्हणून सहकार्य आणि मार्गदर्शन करणार आहे. ते महाराष्ट्र सरकारला करणार आहेत. त्यामुळे नीती आयोगातून दिल्लीवरून कोणीतरी येऊन इतर काहीतरी बदल करणार आहे ही छिद्रानवेशी भूमिका आहे. यासाठी वीस शहरे निवडली जाणार आहेत. त्या वीस शहरांमध्ये पहिल्या चारमध्ये मुंबई आहे. यात मुंबई पहिल्यांदा घेतली. जर नीती आयोगाने चार अन्य शहरे निवडली असती तर कोल्हेकुई करणारे तर मुंबईला का नाही निवडलं मुंबईच्या बाबतीत तकलादू भूमिका, विरोधी भूमिका म्हणून कोल्हेकुई केली असती. असाही आरोप शेलार यांनी केला.
हे सुद्धा वाचा
मंत्रालयाजवळ स्फोट! काही दगड आदळले, खिडक्यांच्या काचा फुटल्या
गिरीष महाजनांचे पाऊल आदित्य ठाकरेंच्याही पुढे
शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज

पहिल्या चार शहरात मुंबई आहे. त्यातही ज्यांचा संजय राऊत झालाय त्या संपादकांनी त्याचा अभ्यास करावा. हा पूर्ण ग्रुप म्हणून एमएमआरचा विषय आहे. आणि एमएमआर म्हणजे केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर त्यात नऊ अन्य महानगरपालिका आहेत. नऊ महानगरपालिका देशापासून वेगळी करणार असं मुर्खांसारख्या विधान करणाऱ्यांना बेअक्कल म्हणावे नाहीतर काय म्हणावे? यांच्या आरोपांना घेऊन वादविवाद करायचा असेल तर उल्हासनगर देशापासून वेगळे होणार आहे का ? ठाणे वेगळे होणार आहे का? मीरा-भाईंदर देशापासून वेगळा होणार आहे का? हा तोडण्याचा डाव आहे ही मूर्खांच्या नंदनवनात जगणारी लोक आहेत.

नीती  आयोग सहकार्य आणि मार्गदर्शन करणार. संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार. ग्रोथ सेंटरचा एमएमआर असणार. केंद्र सरकार त्यात निधी देणार. मुंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करते आहे, आम्ही केंद्राचे अभिनंदन करतो आणि थेट विरोधकांना सांगतो याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्या समोर या… मुंबईच्या विकासासाठी दिल्ली मुंबईकडे येते. मुंबईकरांचा विकास, सुबत्ता, आर्थिक ग्रोथ यातून नोकऱ्या वाढणार आहेत. त्यासाठी दिल्लीकडून मुंबईकरांना सहकार्य करायला येते आहे त्याचे आम्ही स्वागत करतो असेही शेलार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी