27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात; फौजदारी खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश

अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात; फौजदारी खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश

 

राज्याच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड होत आहे. खातेवाटपावरुन शिंदे-फडणवीस आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. तर आता दुसरीकडे शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ही माहिती सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून समोर आली असून या प्रकरणामुळे अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.

2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. 2014 ला खरेदी केलेल्या जमिनीच्या किमतीमध्ये 2019 ला अधिक किंमत दाखवण्यात आली आहे. अशाच 4 ते 5 मालमत्तासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये फरक असल्याचे न्यायालयीन तपासात स्पष्ट झाले आहे. सिल्लोड न्यायालयाकडून आता या प्रकरणावर खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले असून सत्तारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

हे सुद्धा वाचा:

60 वर्षात वर्षांचे रेकॉर्ड केवळ नऊ वर्षात मोडले; मेडिकल कॉलेजच्या उभारणीवरुन गिरीश महाजनांचा काँग्रेसला टोला

अजित पवार यांचा पुणे पालकमंत्री पदावर दावा; चंद्रकांत पाटील यांचे ‘पालकमंत्रीपद’ धोक्यात!

महापालिकांच्या दोन हजार शाळांमध्ये सरकार व्यायामशाळा उभारणार; भाजपची मुंबई पालिकेची जोरदार तयारी

2021 मध्ये सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर ही संपूर्ण माहिती समोर आली. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती मध्ये फरक असल्याचे मान्य करत न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्यावर फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी (12 जुलै) दिले आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले तर सत्तारांची आमदारकी जाईल आणि यामुळे  पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी ते अपात्र ठरतील या सर्व प्रकरणामुळे अब्दुल सत्तार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी