28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयशरद पवारांचा खेळच न्यारा... भुजबळ पवारांबद्दल काय बोलले?

शरद पवारांचा खेळच न्यारा… भुजबळ पवारांबद्दल काय बोलले?

शरद पवार यांनी २०१४ आणि २०१९ तसेच त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय भूमिका बजावली. एकाचवेळी भाजपशी चर्चा आणि मविआचे सरकार अशी त्यांची खेळी होती. यासह अनेक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केले. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. २०१४ पासून शरद पवारांनी कसे राजकारण केले, हे सांगताना सर्व राजकीय घोटाळ्याला पवारच कसे जबाबदार होते, हे भुजबळ यांनी सूचित केले आहे. या मुलाखतीत छगन भुजबळ काय म्हणाले, कोणते गौप्यस्फोट केले, पाहुया

२०१४ मध्ये चारही पक्ष वेगवेगळे का लढले?

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीअगोदर भाजपने शिवसेनेशी युती तोडली. त्यावेळी भाजपने, ‘आम्ही शिवसेनेला सोडतोय तुम्ही काँग्रेसला सोडा’ असा निरोप शरद पवारांना पाठवला. २०१४ ची विधानसभा निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढले. त्यावेळी एक वेगळा निर्णय झाला होता. सुरुवातीला काही दिवस भाजपाचे सरकार असेल. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होईल. शिवाय भाजपला बहुमत न मिळाल्यास बाहेरुन पाठिंबा देण्याचे ठरले. मतमोजणीच्या दिवशी पवारसाहेबांना फोन आला की, तुम्ही पाठिंबा देत असल्याचे जाहीरपणे सांगा. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल्ल पटेलांनी गरज पडल्यास भाजप सरकारला पाठिंबा देईल, अशी घोषणा केली. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली.

२०१४ आणि २०१७ मधील खेळी पवारांचीच

या सर्व घडामोडींनंतर काही दिवसांनी अलिबागला झालेल्या बैठकीत शरद पवारांनी मोठी घोषणा केली. भाजपाने आमचा पाठिंबा कायमस्वरुपी गृहित धरू नये, असे पवार म्हणाले. त्यावर अजित पवार, मी, पटेल आणि जयंत पाटील आम्ही सगळे पवारांना भेटलो. पण त्या वक्तव्यावर पवारांकडे उत्तर नव्हते. आधी पाठिंबा आणि नंतर गृहित न धरण्याचे पवारांचे वक्तव्य यामुळे देवेंद्र फडणवीस सावध झाले. त्यांनी पुढची खेळी करत एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये घेतले आणि थेट मुख्यमंत्री केले. यापूर्वी २०१७ मध्येही एक बैठक झाली. तेव्हा सरकारमध्ये किती मंत्री असतील, त्यांना कुठली खाती दिली जातील, खासदारकीच्या जागावाटपाबाबत सर्व ठरले होते. तेव्हा शरद पवारांनी सांगितले की, आम्ही तुमच्याबरोबर येतो पण तुम्ही शिवसेनेला सोडा. भाजपाने शिवसेनेची साथ सोडण्यास नकार दिल्यामुळे ती बोलणी फिसकटली होती. म्हणजे २०१४ मध्ये आम्ही काँग्रेसला सोडले, भाजपने शिवसेनेला काही दिवस सत्तेबाहेर बसवले शिवाय २०१७ मधील खेळी, हे सगळे शरद पवारांनीच केले होते.

२०१९मधील राष्ट्रपती राजवट ही पवारांची आयडिया

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडिया शरद पवारांचीच होती. २०१९ मध्ये जे घडले ते सर्व पवारांना माहीत होते. भाजपा आणि राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन करण्याचे ठरले होते. त्यामुळे भाजपाने शिवसेनेची साथ सोडली. त्यावेळीच भाजपसोबत जायला हवे होते. पण तेव्हाही शरद पवारांनी माघार घातली. एवढेच नाही तर शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेत पाठिंबा द्यायला जमणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपला साथ दिली.

भाजपसोबत जायचे म्हणून ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मविआ  सरकार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे सर्व भाजपची चर्चा करत होते. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या तब्बल ५४ आमदारांनी भाजपाबरोबर जाणार, म्हणून स्वाक्षऱ्या केल्या होता. त्यानंतरही शरद पवार म्हणाले जमणार नाही, तुम्हाला जायचे तर जा! या सगळ्या घडामोडी शरद पवारांच्या निवासस्थानी घडल्या.

हे ही वाचा

भाजप आमदाराने शरद पवारांच्या केलेल्या एकेरी उल्लेखावर सुप्रिया सुळे चिडीचूप, पण वकिलावर मात्र भडकल्या !

सुप्रिया सुळे कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? पवारांना ‘तो’ म्हणणारा कोण?

ड्रग्ज माफिया भूषण पाटीलला यूपीमधून अटक, ठाकरे गटाकडून दादा भुसेंवर आरोप

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राजीनामा द्यायचा, त्यानंतर सुप्रिया सुळे अध्यक्ष होतील, असे ठरले होते. सुप्रिया सुळेंच्या बरोबर आपण भाजपात जायचे, असेही त्यावेळी ठरले होते. शरद पवार राजीनामा देणार, हे मला माहीत नव्हते. याबाबत मी सुप्रिया सुळेंना विचारले तेव्हा, अजित पवारांना ठावूक होते, असे उत्तर त्यांनी दिले. त्यासाठी पंधरा दिवस चर्चा सुरू होती. त्या चर्चेत मी कुठेही नव्हतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी