22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeक्रिकेटभारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठी रेल्वे विभागाकडून क्रिकेट चाहत्यांना आगळीवेगळी भेट

भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठी रेल्वे विभागाकडून क्रिकेट चाहत्यांना आगळीवेगळी भेट

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना हा केवळ क्रिकेट सामना नसून ऐतिहासिक सामना समजला जातो. दोन्ही संघासाठी हा सामना म्हणजे अस्मिता आहे. या सामन्याकडे केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगातील अनेक क्रिकेटप्रेमींना हा सामना पाहण्यासाठी उत्सुकता असते. या संघांचा स्टेडियमवर जाऊन सामने पाहण्याचे अनेकांचे स्वप्न किंवा इच्छा असते. मात्र बऱ्याचदा काही कारणास्तव क्रिकेटप्रेमींना स्टेडियमवर जाऊन सामने पाहता येत नाहीत. भारत आणि अफगाणिस्तानचा सामना पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहे. मात्र आता क्रिकेट रसिकांना 14 तारखेचा भारत पाकिस्तानचा सामना पाहायचा आहे.

याच सामन्यासाठी भारतीयांना रेल्वे विभागाने एक भेट दिली आहे. हा सामना 14 तारखेला अहमदाबाद येथील भारतातील सर्वात मोठ्या असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी मुंबईतून दोन रेल्वे अहमदाबादला सोडण्यात येणार आहेत. पहिली रेल्वे ही 13 तारखेच्या रात्री सोडण्यात येणार आहे. तर दुसरी रेल्वे ही 14 तारखेला पहाटे सोडण्यात येणार आहे. यामुळे आता क्रिकेटप्रेमींना याचा आनंद घेता येणार आहे. पश्चिम रेल्वेने ही घोषणा करत क्रिकेट चाहत्यांसाठी आगळीवेगळी भेटवस्तू दिली आहे.

हेही वाचा 

मोदी स्टेडियम बनले सुरक्षा छावणी, लक्ष भारत-पाकिस्तान लढतीकडे

‘महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नका’, ड्रग्ज तस्करीवरून पटोले सरकारवर बरसले

शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर? ठाकरेंचा शिवाजी पार्कवर

नरेंद्र मोदी स्टेडियमचा विचार केला तर हे स्टेडियम भरतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी 1 लाख 20 हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटू शकतात. एवढंच नाही तर भारत आणि पाकिस्तान सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याची तारीख पुढे आल्यावर टिकीटांच्या विक्रीत वाढ झाली आहे. रेल्वे विभागाकडून हे आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात कधीच झाले नव्हते.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर कडक बंदोबस्त 

भारत आणि पाकिस्तान या संघा दरम्यान कुठलाही तणाव निर्माण होऊ नये, याची काळजी पोलिसांना घ्यायची आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात क्रिकेटच्या सामन्यावरून अहमदाबादमध्ये जातीय दंगली झालेल्या नाहीत. ही बाब चांगली असून हेच लक्षात घेऊन वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी 11 हजार पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. नॅशनल सेक्युरिटी गार्ड, बॉम्ब निकामी करणारे पथक, ड्रोनद्वारे नजर ठेवणारे पथक अशा पद्धतीचा कडक बंदोबस्त नरेंद्र मोदी स्टेडियमवर ठेवण्यात येणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी