31 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeराजकीयशिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे चोख प्रत्युत्तर

शिवसेना-भाजप ‘राड्या’वर चंद्रकांत पाटलांचे चोख प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईत शिवसेना (Shiv Sena) भवनासमोर शिवसेना आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असे चोख प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे (BJP state president Chandrakant Patil has said that the issue does not end with an incident in politics).

काल शिवसेना (Shiv Sena) भवनासमोर झालेल्या सेना भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा मारामारी बद्दल ते बोलत होते. दरम्यान देशविरोधी बोलणाऱ्याच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवाल देखील त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) विचारला. तसेच विशेष अधिवेशन झाले नाही तर आत्ता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवा अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.

संजय राऊतांचा राज्यपाल कोश्यारींना टोमणा; ट्विटवरून केली टीका

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा भाजपला खोचक टोला

पुण्यात आज चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा कडून वात्सल्य फाऊंडेशनच्या माध्यमातून वंचित मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काल झालेल्या मारामारी बद्दल बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “आता निदर्शने देखील करायची नाहीत का? परवानगी घेऊन २० जणांची निदर्शने होती. पोलिसांनी त्यांना अटक पण केली. सेना भवनासमोर निदर्शने केली.. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयासमोर सेनेने निदर्शने केली. काँग्रेसने पण प्रयत्न केला.”

राम मंदिर प्रश्नावर सेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली. “हिंदूंच्या विषयावर बोलायला पाहिजे असे आम्हाला वाटते. इथेच तर दुराव्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडले. सर्वांनी सलोख्याने राम मंदिर बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचे ते चालवलेले आहेच. त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता तर त्यांना सपोर्ट कसे करता? हे क्लेशदायक आहे. एका खुर्ची पायी…”

Delhi violence: SC will hear police plea against bail order to three student activists on Friday

दरम्यान ही महापालिका निवडणुकांची नांदी आहे का याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणले, “त्याग करणे हा स्थायीभाव आहे आपल्या संस्कृतीचा. परंतु खुर्ची पायी त्याग केला असे नाही तर सगळे सुरळीत चालावे म्हणून घेतलेला निर्णय होता. रोज उठून काही तरी देश विरोधी ताकदीने म्हणायचे आहे त्यात तुम्ही सुरात सुर कुठे मिसळता?”

शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) एकत्र येण्याचा शक्यता संपल्या आहेत का असे विचारल्यावर मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही.”

आरक्षणावर अधिवेशनात २ दिवस चर्चेची मागणी

पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. चंद्रकांच पाटील (Chandrakant Patil) म्हणाले ,”जे जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील त्यांचा पाठीशी आम्ही आहोत.

विशेष अधिवेशन मागता मागता रूटीन अधिवेशन आले. त्यात किमान २ दिवस आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला द्या. काय होते २ तास चर्चा करता तेव्हा सगळ्यांना बोलता येत नाही. विशेष अधिवेशन असेल तर नीट सूचना देता येतात.”

नव्या राजकीय गणिते जुळण्याचा शक्यातेवरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की रणनीती ठरवू. पण बाकी मध्यावदी निवडणुका वगैरे सगळ्या पुड्या सोडल्या जातात. १८ महिन्यात १ दिवस ही असा नाही गेला की नवीन गणिते मांडली गेली नाहीत.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी