27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयघरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवते; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवते; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

नाशिकमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोगण करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरी बसवते. अस म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काल मंत्रिमंडळ विस्तार झाले आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका करायला सुरवात केली. विरोधक अजित पवार यांना अर्थखाते मिळाले म्हणून शिंदे गटावर टीका करत होते . आज नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘लोकांच्या दारोदारी सरकार फिरतंय अशी टीका विरोधक करत आहेत. पण, दारोदारी फिरवून सामान्य माणसांची काम करण्यासाठी आपलं जनतेचं सरकार स्थापन झालेल आहे. सत्ता घरी बसून राहण्यासाठी नसते. ही सत्ता लोकांच्या दारात घराघरात जाऊन योजना राबवण्यासाठी असते. काही लोकांनी घरी बसून कामे केली. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवते’ अस म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

‘शासन आपल्या दारी’ ह्या कार्यक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळत आहे. हा कार्यक्रम क्रांतिकारी असून याच्या माध्यमातून लोकहिताची कामे होत आहेत. अडीज वर्ष विकास कामांना ब्रेक लागला होता पण, शिंदे- फडणवीस सरकारने सर्व स्पीड ब्रेकर काढून विकास कामे पूर्ण केली असे शिंदेंनी म्हटले.

हे सुद्धा वाचा:

शरद पवारांशी पंगा घेतलेल्या भुजबळ यांना अजित पवार पुरवणार बळ

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी भारतीय महिला संघाची घोषणा, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता

धनंजय मुंडे यांची संवेदनशिलता; पाऊस लांबल्यामुळे कृषीमंत्रीपदाची जाण ठेवत वाढदिवस न साजरा करण्याची घोषणा

एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे सरकारमध्ये स्वागत केल आहे. पंतप्रधानांचे नेतृत्व स्वीकारून अजित पवार आणि त्यांचे सहकारी आमच्यासोबत आले त्यांनी राज्याच्या विकास कामाला पाठिंबा दिला आहे असे शिंदे म्हणाले. अजित पवार शिवसेना भाजपा सरकारमध्ये सामील झाल्यामुळे हे सरकार ताकदीने वेगाने निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी