32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयपूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री तत्पर; भाजपचा मात्र मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री तत्पर; भाजपचा मात्र मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

टीम लय भारी

महाड:- अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत विरोधीपक्ष भाजप हल्लाबोल करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याकडे दुर्लक्ष करून आपले काम एकनिष्ठपणे करत असल्याचे दिसत आहे. महाड येथील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली (Chief Minister Thackeray working help flood victims).

महाड येथील परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री इतर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र, विरोधी पक्ष जनतेला मदत करण्याचे सोडून, सत्ताधारी पक्षावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात व्यस्त आहे. महाड येथे बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

अतिवृष्टीने बेहाल जनतेच्या मदतीसाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सरसावले, नाना पटोलेंनी केले कौतुक

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

पाणी ओसरलं आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत (The Chief Minister also said that the citizens should be contacted and shifted to safer places.)

महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

Chief Minister Thackeray working help flood victims
महाड येथील पूरपरिस्थिती

माणगाव  पाचाड मार्गे  महाड  रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव  दापोली  रस्ता  सुरु  झाला  आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली. कोंझर पासून पुढे  तेटघर पर्यंत  रास्ता मोकळा करण्यात आला आहे.  तेटघर पासून पुढे मोहोप्रेमार्गे आचळोली कडून नातेखिंडला पोहोचता येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

Video : मंत्री एकनाथ शिंदे, IAS राजेश नार्वेकर यांची कल्पकता; अन् एक्साईज खात्याची धडक कारवाई

Uddhav Thackeray reviews flood situation in Maharashtra

स्वयंसेवी संस्थांना आवाहन

माणगाव येथे सुमारे 2000 फुड पॉकेट्स तयार आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत अजून 2000 अन्नाची पाकिटे  तयार होतील . याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत.  माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे.  स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी  असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

बचाव पथक आणि आरोग्य यंत्रणा सज्ज

महाड मधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी  घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामुग्री आहे अशी माहिती यावेळी  देण्यात आली. एमआयडीसी चे अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरले आहे (MIDC’s fire brigade has also come to the rescue).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी