33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर नाशिकमधील बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह सोहळा पार पडला

अखेर नाशिकमधील बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह सोहळा पार पडला

टीम लय भारी

नाशिक :- नाशिकमध्ये राहणाऱ्या रसिका आडगावकर आणि असिफ शेख यांचा अखेर गुरुवारी आंतरधर्मीय विवाह सोहळा पार पडला. दोन्ही कुटबियांच्या उपस्थित हा विवाह पार पडला (The much talked about interfaith wedding ceremony).

रसिकाचे वडील प्रसाद आडगावकर हे सराफ व्यवसायिक आहेत तर आसिफचे वडील हे मसाला व्यवसायिक आहेत. रसिका आणि आसिफ यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता. परंतु रसिकाचे वडील प्रसाद यांची इच्छा होती की आपल्या मुलीची हिंदू पद्धतीने पाठवणी करून देण्याची.

पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री तत्पर; भाजपचा मात्र मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या, ‘मवाली’

यासाठी 17 जुलै रोजी रसिका आणि असिफ या दोघांचा विवाह सोहळा निच्छित केला होता. परंतु या विवाहाची माहिती समाज माध्यमातून मिळाल्यानंतर काही धर्मरक्षकांकडून हा विवाह थांबवण्यासाठी दोन्ही कुटुंबियांवर दबाव आण्यात आला. त्याच बरोबर विवाह लावून देणाऱ्या गुरुजींना बहिष्कृत करण्याची धमकीसुध्दा देण्यात आली. त्यामुळे हा विवाह त्यांना रद्द करावा लागला (They had to cancel the marriage).

The much talked about interfaith wedding ceremony
कन्यादान

अतिवृष्टीने बेहाल जनतेच्या मदतीसाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सरसावले, नाना पटोलेंनी केले कौतुक

Maharashtra: Interfaith marriage ceremony held after being called off in Nashik

या प्रकरणाची माहिती मिळताच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आडगावकर कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या या अनोख्या विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला होता. अखेर हिंदू पद्धतीप्रमाणे मंगलाष्टका टाकत व मुस्लीम निकाहानुसार कबूल हे म्हणत हा विवाह सोहळा पार पडला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी