32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयचित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर साधला निशाणा

चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर साधला निशाणा

टीम लय भारी

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर निशाणा साधला होता. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुसलमान आहेत. असा आरोप मलिक यांनी वानखेडे यांची जात प्रमाणपत्र दाखवत केला होता (Chitra Wagh BJP leader targets shiv sena MP Sanjay Raut).

मलिक यांच्या या विधानाचे समर्थन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. मलिक यांनी फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा सांगितली आहे , पुढची मी सांगणार असे राऊत म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

जनतेच्या पैशावर डल्ला मारणा-या ‘ठग्ज ॲाफ बीएमसी’ ला कोण वाचवतंय ? चित्रा वाघ यांचा सवाल

बेकायदेशीर वैद्यकीय अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी नसून मुसलमान आहेत, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची घाई का? असा सवाल चित्रा वाघ यांनी राऊत यांना केला आहे.

कोकणातील वादळग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे अजून मिळाले नाही. मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रस्त आहे त्यांना मोबदला सरकारकडून मिळत नाही आहे. आरोग्य विभागात घोटाळा होत आहेत, एमपीएस्सीच्या तरुणांचे भविष्य अंधारात ढकललं जात आहे. राज्यातील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. या सर्व विषयांवर आपल्याला भाष्य करायचे नाही आहे का ?

वरुण गांधींनी अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ केला ट्वीट, म्हणाले…!

In Aryan Khan Case, Sena’s Sanjay Raut On New Clip: “Witness Made To…”

परंतु तुम्हाला एखाद्या एनसीबी अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून त्याला टार्गेट करायचे आहे. त्याच्या व्यक्तिगत कामावर अटॅक करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे. असे म्हणत चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी