31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयचित्रा वाघ यांचा राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार

चित्रा वाघ यांचा राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार

टीम लय भारी

मुंबई : काही दिवसांपासून राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्ववभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत निवेदन करणारे पत्र दिले आहे (Chitra Wagh’s initiative for the safety of women in the state).

या पत्रात त्यांनी महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर विशेष अधिवेशन बोलवावे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रमाणेच महिला अत्याचारांसाठी ही विशेष न्यायालय असावेत. असे निवेदन चित्रा वाघ यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आहे. देवेंद्र फडणवीसांनी या सर्व बाबतीत लक्ष घालावे व राज्य सरकारला याबाबत सूचना द्याव्या असे वाघ यांनी यात नमूद केले आहे.

ठाकरे सरकार हे बगलबच्च्यांचे सरकार, चित्रा वाघ यांची बोचरी टीका

आम्हाला सुध्दा आरेला कारे करता येत; चित्रा वाघ यांचा राऊतांना इशारा

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये रोड टाकण्यात आला होता. त्याचबरोबर पुणे येथे ६ वर्षांच्या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार करण्यात आला होता. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांची २ बोटे कोयत्याने कापण्यात आली होती. अशा अनेक महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या गोष्टीही या पत्रात चित्रा वाघ यांनी नमूद केल्या आहेत.

परप्रांतातून येणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे

BJP to fight for justice for suicide victim’s kin, says Maharashtra BJP vice-president Chitra Wagh

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी