32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयश्रीरामांविषयी अभद्र बोलणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसने फटकारले

श्रीरामांविषयी अभद्र बोलणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसने फटकारले

टीम लय भारी

मुंबई : ‘रामाची नियत खराब होती. जयकुमार गोरेंची नियत चांगली होती’ अशी मुक्ताफळे उधाळणारे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे (Congress has targeted MLA Jayakumar Gore).

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजप व जयकुमार गोरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. ‘लय भारी’नेच हा व्हिडीओ सर्वप्रथम प्रसिद्ध करून जयकुमार गोरे यांचे पितळ उघडे पाडले होते. ‘लय भारी’च्या या व्हिडीओचा आधार घेऊन सचिन सावंत यांनी जयकुमार गोरे व भाजपवर हल्लाबोल केला आहे (Sachin Sawant has attacked Jayakumar Gore and BJP).

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

BJP : भाजपाला पोस्टरबाजी आली अंगलट ! पोस्टरवरील ‘तो’ शेतकरीच करतोय दिल्लीत आंदोलन

हाच तो व्हिडिओ ज्यात जयकुमार गोरे बरळले

श्रीराम हे बहुजनांचा आदर्श आहेत. पण मनुवाद्यांनी यापूर्वी श्रीरामांचे चारित्र्यहनन करून विषमता पसरवली. आताची मनुवादी भाजपा केवळ सत्तेसाठी रामाचे नाव वापरते. राम मंदिराच्या नावाने जमा केलेल्या पैशाचा अपहार झाल्याची उदाहरणे आहेत. भाजपाचीच नियत खराब आहे. हिंमत असेल तर भाजपने जयकुमार गोरेंवर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

लाचखोर तहसीलदारास रंगेहात पकडले

MLA Leaves BJP For Trinamool, 3rd To Return After Mamata Banerjee’s Win

भगवान श्रीरामांच्या नावाने भाजप लिंचिगचे समर्थन करीत असते. आता रामाच्या चारित्र्याचे भाजप लिचिंग करीत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

गोरे यांच्या वक्तव्यामुळे भक्तांचे चेहरे गोरेमोरे…चूक कोणाकडूनही होऊ शकते, पण ‘चुकीला माफी नाऽऽही’ असे म्हणत, ‘मी तिथे हजर असतो तर..’ असा इशारा देणारे जनआशीर्वादप्राप्त, सिंधुदुर्गचे वैभव असलेले वंदनीय नेते हे गोरे यांच्या कार्यक्रमात नव्हते म्हणून… ते हजर असते, तर मग काय घडले असते?…आता मात्र पक्षाचे पोपट अचानक कुठे गुल्ल झालेत कळत नाही!

-हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी