31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे पोलिसांकडून महिला पोलिसांसाठी खुशखबर

पुणे पोलिसांकडून महिला पोलिसांसाठी खुशखबर

टीम लय भारी

पुणे : पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिसांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांना आता फक्त ८ तास ड्युटी बजावी लागणार आहे. महिला पोलिस ज्यादा तास काम बजावत असून त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात. याच कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे (Pune women police duty hours reduced).

महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सण, उत्सव, बंदोबस्त या निमित्ताने ज्यादा काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर ज्यादा काम केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो.

महाबळेश्वर नगरपालिका टोल मक्तेदाराचे 2 कोटी 19 लाख थकीत

लाचखोर तहसीलदारास रंगेहात पकडले

Pune women police duty hours reduced
महिला पोलिसांना आता फक्त ८ तास ड्युटी बजावी लागणार

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस महिला कर्मचाऱ्यांना १२ तासावरून ८ तास कर्तव्य बजावण्यास सांगावे असा आदेश दिला होता. याच आदेशानुसार ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रशासनाला या बाबतच्या सूचना दिल्या आहेत.

नारायण राणे, कृपाशंकर सिंग या घोटाळेबाजांना भाजपची बक्षिसी; परब – गवळी यांच्यावर कारवाई

Pune Police ASI Found Dead at His Home; Suicide Suspected

या आधीही नागपूर पोलिसांनी या बाबतचा आदेश दिला होता. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २८ ऑगस्ट पासून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तासावरून ८ तास कर्तव्य बजावण्याची मुभा देण्यात आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी