26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयमहादेव जानकरांना काँग्रेसकडून ऑफर, ‘या’ नेत्याने जानकरांवर उधळली स्तुतीसुमने

महादेव जानकरांना काँग्रेसकडून ऑफर, ‘या’ नेत्याने जानकरांवर उधळली स्तुतीसुमने

टीम लय भारी

जालना : ‘महादेव जानकर हे ओबीसींचे लढाऊ नेते आहात. त्यांच्यावर आमचे १०० टक्के प्रेम आहे. कै. गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासावर आणि शब्दावर ते भाजपमध्ये गेले. तिथे पाच वर्षे काम केले. पण आता मुंडे साहेब हयात नाहीत. पंकजाताईंचे भाजपमध्ये फार काही चालत नाही. त्यामुळे तुम्ही काँग्रेसमध्ये या. हे खुले निमंत्रण देण्यासाठी मी मागे पुढे पाहत नाही’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते व माजी खासदार राजीव सातव यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांना जाहीर ऑफर दिली आहे.

महादेव जानकरांना काँग्रेसकडून ऑफर, ‘या’ नेत्याने जानकरांवर उधळली स्तुतीसुमने
जाहिरात

माजी आमदार नारायण मुंडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त खास अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त सामाजिक न्याय मेळावा घेण्यात आला होता. यावेळी सातव व जानकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

‘जानकर यांना आम्ही मंत्री होण्यापूर्वी, मंत्री असताना व मंत्रीपद गेल्यानंतर अशा तिन्ही अवस्थेत पाहिले आहे. ते लढाऊ नेते आहेत. त्यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे नेते आमच्यासोबत असावेत असे कोणाला वाटणार नाही’, असे मत सातव यांनी यावेळी व्यक्त केले.

भाजपवर जानकरांची नाराजी

महादेव जानकर हे धनगर व इतर मागासवर्गीय समाजाचे मोठे नेते आहेत. जवळपास २० वर्षांपासून ते सामाजिक चळवळीत आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय समाज पक्षा’ची स्थापना केली आहे. सन २०१४ मधील लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. सन २०१४ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जानकर यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी अवघ्या ५५ हजार मतांनी जानकर यांचा पराभव झाला  होता. पवार यांच्या बालेकिल्ल्यात जानकर यांनी मजबूत टक्कर दिली होती. मात्र भाजपने जानकरांची फारशी पर्वा केली नाही. जानकर यांच्यामुळे आणि आरक्षण चळवळीमुळे भाजपला धनगर समाजाने भरभरून मते दिली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना दुय्यम दर्जाचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्रीपद दिले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जानकरांना बारामतीमधून लोकसभेचे तिकिट हवे होते. पण फडणवीस यांनी तिकिट दिले नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जानकर यांच्या रासपला एकाही जागेवर उमेदवारी दिली नाही. तरीही जानकरांनी स्वतंत्र उमेदवार उभा करून एक आमदार निवडून आणला. भाजप व फडणवीस यांनी जानकरांच्या बाबतीत वापरा व फेका असे कारस्थान केल्याने जानकर मध्यंतरी भाजपवर कमालीचे नाराज होते असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पंकजाताई म्हणाल्या, माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी