29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयCoronavirus : नीतेश राणे यांचे कपिल पाटलांना प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे स्वतःच्या सुरक्षा...

Coronavirus : नीतेश राणे यांचे कपिल पाटलांना प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे स्वतःच्या सुरक्षा रक्षकांना चहासुद्धा देत नाहीत

कोरोनाच्या ( Coronavirus ) पार्श्वभूमीवर आमदार कपिल पाटील यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर टीकात्मक लेख लिहिला होता. या लेखाला आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नीतेश राणे यांनी दिलेले प्रत्युत्तर जसेच्या तसे…

……………………………………..

सन्मानीय कपिल पाटील

अध्यक्ष, लोकभारती.

महोदय,

सुज्ञास अधिक सांगणे न लगे हे वाक्य आपणाकडून आले असल्यामुळे मुद्दामून आपणाला ह्या पत्राच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी मी आपला विधिमंडळाचा सहकारी म्हणून प्रयत्न करीत आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांचे नेतृत्व करत आहात. म्हणून आपल्याला काही माहिती देणं हे मी माझे कर्तव्य मानतो.

आपण मला जी विनंती केली आहे की, राज्य सरकारला मदत करता येत नसेल तर किमान टीका तरी करू नये, म्हणून माझ्या माध्यमातून कोरोनाच्या ( Coronavirus ) संदर्भात केलेली काही कामे ही आपल्या नजरेत आणू पाहतो. खालील नमूद केलेल्या कामांवर विश्वास नसल्यास आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकभारतीच्या  सहकाऱ्यांकडून माहिती घ्यावी.

१) सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाला मी स्व:खर्चातून ( Coronavirus ) २०,००० हजार मास्क दिलेले आहेत.

२)  मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना सरकारने जिल्हा बंदी केली असल्यामुळे गावी जाता येत नाही. अशी असंख्य चाकरमानी मंडळी जी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, नालासोपारा व मीरा भाईंदर येथे राहतात त्या सगळ्यांना प्रत्येकी दोन दोन महिन्याचा अन्नधान्यांचा साठा आम्ही हेल्पलाईन द्वारे जाहीररित्या पुरवत आहोत.

३) आमचे एस.एस.पी.एम. लाईफ टाईम हॉस्पिटल मधील १०० बेड कोरोना ( Coronavirus ) रुग्णांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला सुपूर्त केले आहे.

४) आरोग्य सेवेतील खाजगी डॉक्टर आणि शासकीय आरोग्य कर्मचा-यांचे प्राण पी.पी.ई किट्समुळे वाचू शकतात त्या  पी.पी.ई किट्स आपल्या सरकारने आजही दिलेल्या नाहीत. अशा ( Coronavirus ) १००० पी.पी.ई किट्स मी स्व:खर्चातून जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेला दिलेल्या आहेत.

५) कोकणातील आंबा बागायतदार यांचे फार मोठे नुकसान हे कोरोना महामारीमुळे झालेले आहे. शेतक-यांनी APMC मार्केटमध्ये आंबा पाठवला आहे. परंतु आजही पडून आहे. याला पर्याय म्हणून मी बिग बाजार, डी मार्ट, महेंद्रा आणि टाटा अशा उद्योगपतींना संपर्क करून गेल्या दहा दिवसांपसून शेतक-यांचा आंबा हा थेट आज बिग बाजारच्या मुंबई  दुकानांमध्ये उपलब्ध करून बाजारपेठ मिळवून दिलेली आहे.

६) इराणमध्ये आमचे काही सिंधुदुर्गमधील तरुण अडकलेले होते. परराष्ट्रीय मंत्रालयाशी संपर्क करून त्यांना परत सुखरूप सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये आणण्याचे कामही माझ्या प्रयत्नाने झाले आहे.

७) गोवा राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास १५०० तरुण तरुणी नोकरीसाठी जातात पण कोरोनामुळे ( Coronavirus ) सरकारने जिल्हाबंदी केली म्हणून ते इकडे परत येवू शकले नाही. आमची अपेक्षा होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोवाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावे, पण असे काही झाले नाही. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांना अन्न धान्याची सोय करून दिली आणि आजही त्यांची काळजी घेत आहोत.

Coronavirus
नीतेश राणे यांनी कपिल पाटील यांना दिलेले प्रत्युत्तर

Coronavirus : नीतेश राणे यांचे कपिल पाटलांना प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे स्वतःच्या सुरक्षा रक्षकांना चहासुद्धा देत नाहीत Coronavirus : नीतेश राणे यांचे कपिल पाटलांना प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे स्वतःच्या सुरक्षा रक्षकांना चहासुद्धा देत नाहीत

आमदार महोदय ही काही मोजकी कामे जी मी माझ्या जनतेसाठी करू शकलो याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. ही कामे कोणावर उपकार नाही तर माझ्या जनतेची प्रामाणिक सेवा म्हणून सरकारच्या निर्णयासाठी न थांबता जनतेचा सेवक म्हणून मी केलेली आहेत. अजून कामांची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर मी नक्कीच फोन करून आपल्याला देईन.

आपण असाही उल्लेख केलेला आहे की, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या घराजवळचा चहावाला कोरोनाग्रस्त ( Coronavirus ) झालेला असल्यामुळे ते संकटात आले आहेत. तरीही ते राज्याच्या जनतेची सेवा करत आहेत.

महोदय, आपल्याला हे सांगणे आहे की, कदाचित आम्ही जितकी वर्ष ठाकरे कुटुंबियांना ओळखतो तेवढी आपली ओळखही नसेल. म्हणून जास्त खोलात न जाता ह्या मुद्द्यावर एवढेच सांगेन की, स्वत:च्या सुरक्षा कर्मचा-यांना आपल्या घरी चहा न देता समोरच्या चहा वाल्याकडे जावे लागत असेल तर आपणच अशा स्व:भावाचा अंदाज घेवून विचार करावा. जे सुरक्षा कर्मचारी आपल्या आयुष्याची पर्वा न करता मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा करत असतील त्यांना एक कप चहा पाजण्याचे दातृत्व दाखवले जात नसेल तर याला आपण काय म्हणणार याचा विचार आपणच करावा.

मी एक विरोधी पक्षांचा आमदार म्हणून जनतेसमोर सरकारच्या चुका दाखवण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. जे सत्य आहे ते जनतेसमोर आलेच पाहिजे. आज महाराष्ट्र राज्य कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. प्रशासकीय पातळीवर विविध चुका होत आहेत. याबद्दल बोलणे हीच एक संधी असल्याने विरोधी पक्षाचा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धरून आहे.

आपण एक जवाबदार लोकप्रतिनिधी आहात म्हणून आपल्या समोर ही माहिती ठेवणे हे मला गरजेचे वाटले म्हणून हे पत्र आपल्याला लिहित आहे. बाकी सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

https://twitter.com/LayBhari3/status/1248144965617831937?s=20

आपला,

नीतेश नारायणराव राणे

हे सुद्धा वाचा

Coronavirus : नितेश राणेंना कोण सांगणार ?

Covid19 : उद्धव ठाकरेंच्या ट्विटवर हृतिक रोशन, सोनम कपूर, परिणीती चोप्राने व्यक्त केली भावना, अंधभक्ताने त्यांनाही ठरविले ‘विकाऊ’

कोरोनाबद्दल WHO ने प्रसिद्ध केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी