27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयनाशिकच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

नाशिकच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

अजित पवार आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. सकाळी वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकमध्ये पोहोचले तेव्हा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अर्थमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिला कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमात बोलत असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आदिवासी बांधव, तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा निधी पुरविण्यात येईल. नाशिक जिल्ह्याच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी नाशिककरांना आश्वासन देत नाशिकला झोपडपट्टी मुक्त तसेच गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करायची आहे. त्यासाठी प्रयत्न करु असे अजित पवार म्हणाले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अडचणीत आहे. आजपर्यंत बॅंकेचे चांगले नाव होते. मात्र काही कारणांनी बॅंक अडचणीत आली आहे. जिल्ह्यात 112 शिबिरे झाली, त्यात 11 लाखांपेक्षा जास्त लोकांना फायदा मिळाला. 15 जुलै उजाडून सुद्धा पाऊस नाही, पेरण्या नाही. धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आहे. त्यांनी पांडुरंगाला पावसासाठी साकडं घातले आहे. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेला नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे असे अजित पवारांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा:

घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवते; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

शरद पवारांशी पंगा घेतलेल्या भुजबळ यांना अजित पवार पुरवणार बळ

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी भारतीय महिला संघाची घोषणा, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता

अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अशी दोन पदे त्यांना मिळाली. आता राज्यात दोन नाही तर तीन इंजिनचे सरकार आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेला शासन आपल्या दारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी