30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयबंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकावर डागले फोटोअस्त्र

बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकावर डागले फोटोअस्त्र

शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप रविवारी झाला आहे. देशाचे जाणते नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धोबीपछाड देण्यासाठी भाजपने अजित पवार यांची नाराजी ओळखत त्यांना थेट उपमुख्यमंत्री केले, शिवाय त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी ८ जणांना मंत्रीही केले आहे. आता राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे गट पडले आहेत. जुने कार्यकर्ते, अजित पवार विरोधक आमदार, कार्यकर्ते यांचा शरद पवार यांना पाठिंबा आहे. तर काहीतरी मिळेल या आशेवर असणारे अजित पवार यांच्या सोबत आहेत. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला आहे. शिवाय शरद पवार यांचे फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

शिंदे गटाने बंड केल्यावर एकनाथ शिंदे गट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपल्या स्टेजवर लावू लागल्यावर उद्धव ठाकरे गटाने त्यास आक्षेप घेतला. नंतर तर उद्धव ठाकरे जाहीर सभेत बाप चोरणारी टोळी राज्यात आली आहे, असे बोलून शिंदे गटाच्या शिवसेनेवर टीका करू लागले. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी देवासमान आहेत. त्यामुळेच त्यांच्या नावाचा आणि फोटोचा आसरा शिंदे गटाची शिवसेना घेत आहे. तोच कित्ता आता अजित पवार यांनी गिरवायला सुरुवात केली आहे. काका पर्यायाने राजकीय गुरुशी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला फारकत घेत त्यांनी राष्ट्रवादीत भूकंप आणला असला तरी तळागाळातील कार्यकर्ते शरद पवार यांनाच मानत असल्याने त्यांनी फोटोअस्त्र काका विरोधात वापरायला सुरुवात केली आहे.

राज्यात काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत, पण त्यावर शरद पवार यांचा फोटो नसल्यामुळे चर्चा रंगल्या होत्या. यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले की, राज्यात कुठेही बॅनर लावणार असाल तर त्यावर शरद पवार यांचे फोटो लावा. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी बाळासाहेबांचा फोटो बॅनर लावायला सुरवात केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ‘माझ्या बापाचा फोटो का लावता स्वत:च्या बापाचा फोटो लावा, राज्यात बाप चोरणारी टोळी आली आहे.’ अशी टीका शिंदे गटावर केली होती. तसेच वारंवार त्यांनी त्यांच्या भाषणातून सुद्धा हे बोलून दाखवले आहे.

हे सुद्धा वाचा:

येवा कोकण आपलास आसा; कोकणासाठी आणखी 52 गणपती स्पेशल ट्रेन!

एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी पवारांचे आव्हाड यांना बळ; राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी, पक्ष प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी भ्रष्ट पक्ष असेल तर त्याचे आमदार भाजपला कसे चालतात?; शरद पवार यांचा मोदी यांना सवाल

अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतर अजित पवार यांनी दावा करत म्हटल की, आम्हाला पक्षाचा पाठिंबा आहे. तसेच पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील आमच्याकडे आहे. आणि आम्ही याच चिन्हावर निवडणूक लढवणार. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे राज्याला आत्ता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. राज्यात आत्ता शिंदे- फडणवीस नाही तर शिंदे-फडणवीस-पवार सरकार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी