35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयVIDEO : देवेंद्र फडणवीस यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

VIDEO : देवेंद्र फडणवीस यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप व शिवसेनेमध्ये सत्तेचे वाटप करण्याबाबत कोणता फॉर्म्यूला ठरला होता, याबाबत माहिती देणारा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतील हा व्हिडीओ आहे. भाजप व शिवसेनेमध्ये समसमान वाटप करण्यात येईल. तसेच पदे व जबाबदाऱ्यांचेही समसमान वाटप होईल, असे मुख्यमंत्री या पत्रकार परिषदेत बोलत आहेत. परंतु मुख्यमंत्रीपदाच्या अडिच वर्षे कालावधीबाबत ते काहीही बोलताना दिसत नाहीत. मात्र पद व जबाबदारीचे समसमान वाटप करण्याबाबत त्यांनी केलेले वक्तव्य हे मुख्यमंत्रीपदालाही तांत्रिकदृष्ट्या लागू होते. त्यामुळे शिवसेनेने अडिच वर्षे कालावधीकरीता मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे पुष्टी मिळत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी