27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशिवसेनेच्या जाहिरातीमुळे फडणवीसांचा एकनाथ शिंदेंसोबतचा कोल्हापूर दौरा रद्द ? राजकीय वर्तुळात चर्चांना...

शिवसेनेच्या जाहिरातीमुळे फडणवीसांचा एकनाथ शिंदेंसोबतचा कोल्हापूर दौरा रद्द ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला. फडणवीस यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हा दौरा रद्द केला जात आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कोल्हापूरात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक हा दौरा रद्द झाल्यामुळे याचा सबंध शिवसेनेने दिलेल्या जाहिरासोबत जोडला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आज राज्यातील अनेक वर्तमानपत्रांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जाहिरात दिली आहे.

शिवसेनेने ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ अशी जाहिरात आज प्रसिद्ध केली असून या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मात्र गायब आहे. शिंदे हे फडणवीसांपेक्षा लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, असा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्याला जाण्यास नकार दिला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

 

हे सुध्दा वाचा:

मुंबई- पुणे एक्सप्रेसवर मोठा अपघात, ऑइल टॅंकरला आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

जुहूच्या समुद्रात पोहायला गेलेली सहा मुले बुडाली ; दोघांना वाचवण्यात यश,दोन मृत तर दोघांचा शोध सुरु

जानू भोये नगरमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांच्या घराचे स्वप्न साकार

या आधी ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’या जाहिराती आपण पाहिल्या आहेत. पण ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ ही जाहिरात प्रसिद्ध करून फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे.
या विषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कानाचा त्रास होत आहे. सायनसचा त्रास बळावल्यामुळे डॉक्टरांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवस विमानाचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे’. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरला रवाना होणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी