32 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरराजकीयएक फुल, दोन हाफने लाठीचार्जचे खापर पोलिसांवर फोडले

एक फुल, दोन हाफने लाठीचार्जचे खापर पोलिसांवर फोडले

जालना येथे शांतेतेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज करून बेदम बदडले. या घटनेने राज्यातील मराठा समाज सरकार विरोधात गेल्याचे चित्र असताना, ‘लाठीचार्जचे आदेश दिले हे जर सिद्ध केले तर आम्ही तिघेही राजकारण सोडू,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चॅलेंज दिले आहे. पण राज्यातील एक फुल दोन हाफचे सरकार आमचा काहीही दोष नसताना आमच्यावर खापर का फोडतात असि दबक्या आवाजातील चर्चा आता पोलिस करू लागले आहेत. पोलिसांना वरून ऑर्डर आल्याशिवाय शक्यतो लाठीचार्ज होत नाही, असे असताना हे एक फुल, दोन हाफचे  सरकार आपले पाप लपवण्यासाठी आमचा बळी का देत आहे, असा सवाल आता पोलिस करू लागले आहेत.

बुधवार, गुरुवारी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होती. या बैठकीने राज्यात सत्ताधाऱ्याविरोधात वातावरण निर्माण व्हायला लागले आहे. असे असताना या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी शुक्रवारी मंत्रालयातून लाठीचार्जचे आदेश देण्यात आले होते. पण हे आदेश देणाऱ्यांना अशा लाठीचार्जमुळे मराठा आंदोलक घाबरतील असे वाटत होते. पण शुक्रवारची लाठीचार्ज ची बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली आणि मराठा समाज सरकार विरोधात आक्रमक होत रस्त्यावर उतरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जालनाला पोहचले आणि त्यांनी या घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वरून लाठीचार्जचे आदेश आल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, असा आरोप केला. त्यानंतर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे हे जालनाला आले आणि त्यांनीही हाच आरोप केल्याने राज्यातील सत्ताधारी मंडळींची चांगलीच गोची झाली.

जालना घटनेचे पडसाद शनिवारपासून राज्यात उमटायला लागले. ते सोमवारपर्यंत कायम होते. हे प्रकरण हातातून जावू लागले असल्याचे निदर्शनास येताच राज्यातील एक फुल दोन हाफच्या सरकारने सह्याद्री अतिथी गृहात तातडीची बैठक बोलावून यातून तात्पुरता मार्ग काढण्याचे नेपथ्य रचले. दरम्यानच्या काळात दुपारी खासदार अर्जुन खोत, महादेव जानकर उपोषण स्थळी पोहचले. या दोघांनी मनोज जरांदे पाटील यांना विविध भुलथापा दिल्या. पण ते काही बधत नसल्याचे शिवाय उपोषण मागे घेत नसल्याचे निदर्शनास येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (१) देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री (२) अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

शिंदे, फडणवीस यांनी मराठा समाजासाठी सरकारने काय काय कामे केली याची जंत्री मांडली. अजित पवार यांना विरोधकांवर हल्ला करण्यासाठी सोडले. आणि अजित पवार यांनी, ‘लाठीचार्जचे आदेश दिले हे जर सिद्ध केले तर आम्ही तिघेही राजकारण सोडू,’ असे मत ठोकून दिले. पण यानंतर राज्यातील पोलिसांचे मनोबल खच्ची होऊ लागले आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाल्यावर पोलिसांवर अतिरिक्त ताण पडू लागला आहे.
हे सुद्धा वाचा
भाजप आमदाराने म्हाडा लॉटरीत जिंकलेल्या कोट्यवधींच्या घरावर सो़डले पाणी
जान्हवी-गौरवने एकाच दोरीला गळफास लावून आयुष्य संपविले
गोविंदा आला रे आला…. आकर्षक रंगातली मडकी बाजारात दाखल

असे असताना ते इमाने इतबारे आपली सेवा देत असताना, पोलिसांची ढाल करून सरकार विरोधक आणि मराठा आंदोलनकर्त्यांवर तुटून पडत आहे, हे चुकीचे आहे, अशी चर्चा पोलिस दलात सुरू झाली आहे. एखाद्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जात आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर लाठीचार्ज करण्याचे आदेश पोलिसांना सरकारकडून देण्यात येतात. जालनामध्ये मराठा आंदोलक शांतपणे आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणेच चुकीचे होते. त्यामुळे परिस्थिती चिघळली, असे काही माजी पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी