25 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरक्रिकेटवर्ल्डकप साठी भारतीय संघ जाहीर; या बड्या खेळाडूला मिळाला टीममधून डच्चू

वर्ल्डकप साठी भारतीय संघ जाहीर; या बड्या खेळाडूला मिळाला टीममधून डच्चू

भारतीय क्रिकेट संघाने आज आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली असून निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर केला. यंदाचा विश्वचषक भारतात होणार असून ऑक्टोबर महिन्यापासून स्पर्धेची सुरवात होणार आहे. स्पर्धेसाठी संघात किरकोळ बदल केले असून अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन यांना मात्र संघात स्थान मिळवता आले नाही.

सध्या पाकिस्तान आणि श्रीलंकेत होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत पूर्ण ताकदिनीशी उतरला आहे. पुढच्याच महिन्यात होणाऱ्या विश्वचषकसाठी भारतीय संघाला या स्पर्धेतून चांगला अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा आयसीसी ट्रॉफीजचा दुष्काळ संपवण्याची भारताला चांगली संधी आहे. ५ ऑक्टोबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार असून सलामीची लढत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने होणार आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघात फार बदल केले नसून आशिया चषकातील संघाप्रमाणेच हा संघ असेल. फक्त फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला संधी मिळाली असून आशिया चषक संघातील तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान मिळू शकले नाही. आशिया चषक संघातून डच्चू मिळालेल्या यजुवेंद्र चहल विश्वचषक संघात ही स्थान मिळवू शकला नाही. आशिया चषकात राखीव खेळाडू म्हणून प्रवास करणाऱ्या संजू सॅमसन याला देखील संघात स्थान मिळाले नाही. याशिवाय, संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेले फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर शिखर धवन यांनादेखील संधी मिळू शकलेली नाही.

नुकतेच दुखापतीतून बाहेर आलेले के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना आशिया चषकाप्रमाणेच विश्वचषक स्पर्धेतही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ते सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची धुरा शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन यांच्यावर असेल तर हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल हे ऑल राऊंडर फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये संघाला मजबूती देतील. तेज गोलंदाजीची धुरा जसप्रीत बूमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज कडे असेल. तर कुलदीप यादव हा जडेजा आणि अक्षरसह फिरकी गोलंदाजी सांभाळेल.

हे ही वाचा 

बूमराह झाला ‘बाप’! इन्स्टावरुन दिली ही मोठी बातमी..

Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..

आशिया चषक २०२३: राहूल द्रविडने फोडली मोठी बातमी!

विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका – २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – १२ नोव्हेंबर, बंगळुरू

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी