27 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरमुंबईभाजप आमदाराने म्हाडा लॉटरीत जिंकलेल्या कोट्यवधींच्या घरावर सो़डले पाणी

भाजप आमदाराने म्हाडा लॉटरीत जिंकलेल्या कोट्यवधींच्या घरावर सो़डले पाणी

भारतीय जनता पक्षाचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी म्हाडाच्या लॉटरीत दक्षिण मुंबईत घर जिंकले होते. मात्र हे घर खरेदी करण्यापासून त्यांनी माघार घेतली आहे. ताडदेव येथील म्हाडाच्या एका इमारतीत त्यांना 7.58 कोटी रुपये किंमतीचे घर लॉटरीत लागले होते. मात्र घर खरेदीसाठी ते गृहकर्ज मिळवू न शकल्याने त्यांना त्यावर पाणी सोडावे लागल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. कुचे यांनी माघार घेतल्याने वेटींगवर असणारे खासदार भागवत कराड यांचा मात्र मार्ग मोकळा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गृहकर्जाची व्यवस्था करता येत नसल्याने त्यांचे अलिशान घराचे स्वप्न भंगले आहे. म्हाडा सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रामुख्याने ओळखली जाते. मात्र म्हाडाची घरे देखील कोट्यवधींच्या किंमतीत गेल्यामुळे कुचे यांना लॉटरीत जिंकलेले घर नाकारावे लागले आहे. तरी देखील कुचे यांना त्याच इमारतीत अनुसूचित जाती या कोट्यातून 9 व्या मजल्यावर फ्लॅट लॉटरीत जिंकला आहे. कुचे यांची 2019 सालच्या प्रतिज्ञापत्रासूनसार त्यांच्या मालमत्तेचे मुल्य 3.23 कोटी होते. तर दायित्त्व 18.3 लाख होते.

आमदार कुचे यांनी 7.58 कोटी रुपयांचे घर घेण्यापासून माघार घेतल्यामुळे भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांना मात्र संधी उपलब्ध झाली आहे. भागवत कराड या लॉटरी सोडतमध्ये वेटींगवर होते, 14 ऑगस्ट रोजी, कुचे यांनी क्रिसेंट टॉवरमधील 19व्या मजल्याचा फ्लॅट खरेदी करण्याची लॉटरी जिंकली. 20 जुलै रोजी, एका इंग्रजीवृत्तपत्राने बातमी दिली होती की खासदार/ आमदार/ विधानपरिषद आमदार आरक्षण कोट्याअंतर्गत, 1,531.70 चौरस फुटांच्या विस्तीर्ण मालमत्तेसाठी हे दोघे एकमेव दावेदार होते. खासदार कराड हे आता उच्च मालमत्तेचे एकमेव लाभार्थी आहेत.
हे सुद्धा वाचा 
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा
ट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश

क्रिसेंट टॉवर येथे, गृहनिर्माण लॉटरी अंतर्गत विक्रीसाठी वेगवेगळ्या चटई क्षेत्राचे एकूण आठ अपार्टमेंट होते. त्यांपैकी पाच सामान्य सार्वजनिक प्रवर्गांतर्गत आणि प्रत्येकी एक अनुसूचित जाती, खासदार/आमदार/ विधान परिषद आमदार आणि राज्य सरकारी कर्मचारी आरक्षण प्रवर्गांतर्गत आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी