28 C
Mumbai
Thursday, November 23, 2023
घरराजकीयपृथ्वीराज चव्हाणांचे काम; श्रेय मात्र आमदार गोरेंना, डॉ. रणजीतसिंह देशमुख बरसले

पृथ्वीराज चव्हाणांचे काम; श्रेय मात्र आमदार गोरेंना, डॉ. रणजीतसिंह देशमुख बरसले

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त भाग आहे. गेली अनेक वर्षांपासून या भागात पाण्याची कमतरता पाहायला मिळते. याचा विपरीत हा वन्य जीवांवर होताना दिसतो. पाणी टंचाई असल्याने या भागात गुरा-ढोरांच्या चाऱ्याची कमतरता सदैव जाणवू लागते. आजही महिला कोसावरून पाणी आणताना दिसत आहेत. पाणी टंचाई असल्याने मुळ व्यवसाय शेती असला तरी पिक वाढवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र आता मुळ साधनच नसल्याने याचा परिणाम हा माण-खटावच्या विकासावर दिसत आहे. येथील स्थानिक आमदारांनी देखील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम करायचा प्रयत्न केला. पाणी टंचाईच्या समस्येवरून अनेकदा आंदोलने देखील झाली आहेत. मात्र अजूनही त्यावर कोणताही तोडगा नाही. यावर आता डॉ. रणजीतसिंह देशमुखांनी मौन सोडले मौन सोडले आहे.

माण – खटावचे नेते डॉ. देशमुख हे नेहमीच स्थानिक राजकारणात सक्रिय असतात. ते अनेकदा विराधकांवर केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी पाणी टंचाई या मुद्दयावरुन समस्याचे निराकरण न करणार्यांवर संताप व्यक्त केला आहे. पाणी टंचाई प्रश्न मिटण्यासाठी अनेकदा सांगली जिल्ह्यातील लोकांनी आंदोलन केले होते. यावेळी येथील मंत्री आणि स्वयंघोषित हवामान खात्याचे मंत्री परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करत होते. या भागातील जनतेची नेहमीच अवहेलना झाली आहे. नुसते फलक लावून तालुका जलमय होत नसतो. त्यासाठी जनमानसात जावे लागते. अशी शाब्दीक फटकेबाजी डॉ. देशमुखांनी केली आहे.

हे ही वाचा 

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा; ६ महिन्यात १३३ वेळा बदल्या

लोकशाहीची चिरफाड करणारे ‘गिधाडांची मेजवानी’

अक्षय कुमारची स्कुटीवर हैदराबादची सफर! सहप्रवाशाला पाहून फॅन्स चक्रावले!

काय म्हणाले डॉ. देशमुख?

पाणी टंचाई प्रश्न मिटण्यासाठी अनेकदा सांगली जिल्ह्यातील लोकांनी आंदोलन केले होते. यावेळी येथील मंत्री आणि स्वयंघोषित हवामान खात्याचे मंत्र्यानी परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र फलक लावून तालुका जलमय होत नसतो. त्यासाठी जनमानसात जावे लागते. जलनायक नाव लावणाऱ्या काही प्रतीनिधींचे, नेत्यांचे पाणी प्रश्न सोडवण्या संदर्भात अपयश पहायला मिळते. माण – खटावला आता पिकविम्यातूनही वगळले आहे. तर या दोन तालुक्यांना अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखले जात आहे. यामुळे आता ट्रीगर वन टू ची नौटंकी करणार्यांनी जनतेची हेळसांड केली आहे.

कागदी घोडे नाचवता   

कॉंग्रेसने याआधी आंदोलने केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची दुष्काळग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आहे. यावेळी पाण्याचे टॅंकर गावोगावी येवू लागले होते. मात्र कालांतराने टॅंकर येणे बंद झाले आहेत. कागदी घोडे नाचवत दोन्ही तालुक्याच्या जनतेची दिशाभूल करत आहात, अशी टीका डॉ. देशमुखांनी केला आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी