31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
HomeराजकीयElection Commission: शिवसेना पक्ष कुणाचा फैसलाच करता आला नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय...

Election Commission: शिवसेना पक्ष कुणाचा फैसलाच करता आला नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय नेमका काय?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांनी पक्षावर दावा सांगत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना कागदपत्रे जमा करण्यास सांगतले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम निर्णय़ घेता आला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश देत शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धणुष्यबाण हे निवडणूक आयोगाने तात्परत्यास्वरूपात गोठवले आहे.

आगामी निवडणूकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षासाठी नाव आणि चिन्ह कोणते वापरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत.

‘पक्षचिन्ह इतिहास जमा झाले’ –

दरम्यान राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी कायद्याचा दाखला देत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कायमस्वरुपी इतिहासजमा झाल्याचे म्हटले आहे. आता दोन्ही गटांना नवी चिन्हे दिली जातील. दोन्ही गटांना नवी चिन्ह दिली जातील. त्यामुळे दोन्ही गटांना नवे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जावे लागेल. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह इतिहास जमा झालं, असं म्हणता येईल. कोणताही निर्णय तात्पुरता असं म्हणता येत नाही, असे श्रीहरी अणे म्हणाले.

हे सुद्धा वाचा –

Uddhav Thackeray: जयदेव ठाकरेंचा शिंदे गटाला पाठींबा; मुलगा जयदीप मात्र उद्धव काकांसोबत

Congress President Election: मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांना रिमोट कंट्रोलने नियंत्रित करण्याचा प्रश्नच पडत नाही

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रात्री आठ वाजता सुद्धा सामान्य लोकांना भेटतात

पुढची रणनीती ठरवू –

आज निवडणूक आयोगाने दिलेल्या अंतरिम आदेशाबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय बंधनकारक असून आम्हाला स्विकारावा लागणार आहे. यापूढे काय रणनीती आखायची ते ठरवू.

असा निर्णय येणे अनपेक्षित होते –

ठाकरे गटाचे खासदार विनय राऊत म्हणाले आहेत की, ”निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्हाला काही बोलायचे नाही. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याबाबत आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नाव आणि धनुष्यबाण याबाबतची चर्चा करून निवडणूक आयोगाला पत्र लवकरच पाठवू.” यावरच बोलताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले आहेत की, हा निर्णय अनपेक्षित होता. हा निर्णय धक्कादायक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी