30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार नाही; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार नाही; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. शिंदे गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम मुंबईतील नेस्को सेंटर पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, ठाकरे यांनी मतदारांशी द्रोह केला. खुर्चीसाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले. ते खरे गद्दार आहेत. बाळासाहेबांनी काँग्रेससोबत जाणार नाही असे सांगितले होते. मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि सरकार काँग्रेस व राष्ट्रवादी चालवत होते, हे असेच चालू राहिले असते, तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेसुद्धा राहिलो नसतो. शिवसेना वाचविण्याचे काम आम्ही केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे धाडस केले आहे, वाघाची डरकाळी होऊपर्यंत तुमची कोल्हेकुई असते. मी कालही कार्यकर्ता होतो, आज ही आहे आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. गद्दारी तुम्ही केली, तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही, अशी टीका देखील उद्धव ठाकरेंवर त्यांनी यावेळी केली.
हेलिकॉप्टरमधून फिरणारे शेतकरी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर केली होती. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले मी मुख्यमंत्री म्हणून हेलिकॉप्टरने जातो आणि शेतकरी म्हणून शेती करतो. हा मुख्यमंत्री रस्त्यात फाईलींवर सह्या करतो, शेतात असलो तरी सह्या करतो. या पठ्ठ्याने ११ महिन्यांमध्ये 75 कोटी रुपये वाटले. हे सरकार गतीमान सरकार आहे. तुम्ही रिक्षावाल्याला नावे ठेवता पण याच रिक्षावाल्याने तुमची मर्सिडीज खड्ड्यात घातली असा घणाघात शिंदे यांनी ठाकरेंवर केला.

हे सुद्धा वाचा

मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिन द्यायची गरज; उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या अनियमिततेची एसआयटी चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश; तळीयेतील ६६ दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे

शिंदे यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटले, बाळासाहेबांनी घामातून, कष्टातून निर्मान केलेली शिवसेना तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार वर्षा बंगाला सोडताना होताना आम्हाला घराबाहेर काढले असे सांगितले. वर्षा सोडताना त्यांच्या गळ्यावर पट्टा होता. मोठ्या बॅगा होत्या. काही लोकांना त्यांनी बॅगा घ्यायला सांगितले. काहींनी रडायला सांगितले. खरे तर सत्ता येते सत्ता जाते, एवढे मनाला लावून घ्यायचे नसते. मात्र दुसऱ्या दिवशी गळ्यातला पट्टा गायब झाला. माणूस तरातरा चालायला लागला. असे सांगत ते म्हणाले, ही करामत कोणी केली माहितीय ? डॉ. एकनाथ शिंदेची ही करामत आहे. असे शिंदे यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी