25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रधनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत

धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत

राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावरून वाद सुरू आहेत. मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र ओबीसी आपल्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास नकार देत आहे. यामुळे राज्यभरात आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा-धनगर दोन्ही समाज आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत. दोन्ही समाजातील तरूण आत्महत्या करत आहेत. त्यांच्या घरच्यांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांआधी मराठा समाजाच्या अनेक आंदोलकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. तर धनगर आरक्षणासाठी देखील सांगलीतील एका तरूणाने आत्महत्या केली आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील आंदोलक सुनील कावळे यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. तेव्हापासून आंदोलनास वेग आला. त्यानंतर आळंदीतील २२ वर्षीय सिद्धेश बर्गेने आत्महत्या केली. तर धनगर आरक्षणासाठी सांगली जिल्ह्यातील बिरूदेव खर्जे या युवकाने आपल्या सांगली जिल्ह्यातील जत तालक्यातील आबाचीवाडी या आपल्या गावात आत्महत्या केली आहे. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर बिरूदेवच्या अंत्ययात्रेसाठी गेले होते. यावेळी बिरूदेवच्या कुटुंबाची जबाबदारी घेत असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी घेतली.

काही दिवसांपूर्वी आरेवाडी येथे गोपीचंद पडळकरांचा दसरा मेळावा झाला होता. यावेळी बिरूदेव घरातूनच आपल्या मोबाईलवर गोपीचंद पडळकरांचे भाषण ऐकत होते. यावेळी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, हा विचार त्यांच्या मनात आला. यावेळी त्यांनी शेतात जाऊन एका झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली. यावेळी बिरूदेवची मुलगी त्या ठिकाणी गेली असता, गावात आत्महत्येची खबर सर्वत्र पोहोचली. ‘धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे’, यासाठी आत्महत्या करत असल्याचे कारण बिरूदेवने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. यावरून आता गोपीचंद पडळकरांच्या मदतीने सरकारच्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या बिरूदेवच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली आहे.

धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत

हे ही वाचा

MPSC अध्यक्ष आहेत कुठे? रोहित पवार यांचा सवाल

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

इस्रायलच्या हल्ल्यात बालकांचं काय होतंय?

मराठा समाजातील अनेक युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. धनगर आणि इतर समाजातील युवकांनी देखील आत्महत्या केल्या आहेत. यांना देखील आर्थिक मदत मिळणार का? सरकारने किती मराठा, धनगर तसेच इतर जातीय आंदोलकांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत केली? किती आत्महत्या आंदोलकांना सरकारी नोकरी दिली? असा सवाल आता उपस्थित होतोय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी