28 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरमहाराष्ट्रMPSC अध्यक्ष आहेत कुठे? रोहित पवार यांचा सवाल

MPSC अध्यक्ष आहेत कुठे? रोहित पवार यांचा सवाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गेल्या दीड महिन्यांपासून अध्यक्षांच्या प्रतीक्षेत असून महिन्याभरापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्यामुळे महाराष्ट्रातील लाखों तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यामुळे, राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक परीक्षेतील सुमारे 10 हजार पात्र उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत. यावरुन, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली असून, ‘अध्यक्षांच्या नियुक्तीलाच इतका वेळ लागत असेल तर उमेदवारांच्या नियुक्तीला किती वेळ लागेल?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या “X” अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर} यावरून टीका करत म्हणाले, “#MPSC च्या माध्यमातून होणाऱ्या PSI सह विविध पदांच्या नियुक्तीसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या असताना #MPSC चं अध्यक्षपद गेल्या दिड महिन्यापासून रिक्त आहे.. त्यामुळं राज्यातील युवांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय… ”


“MPSC मधील मनुष्यबळ वाढवण्याची वारंवार मागणी करूनही सरकार त्याकडं दुर्लक्ष करत आहे.. अध्यक्षांच्या नियुक्तीलाच इतका वेळ लागत असेल तर उमेदवारांच्या नियुक्तीला किती वेळ लागेल, हे देव जाणे.. म्हणूनच या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी… #युवा_संघर्ष_यात्रा,” ते पुढे म्हणाले.

राज्यातील लाखों तरुण हे दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात. अनेक तरुणांचे अधिकारी बणण्याचे स्वप्न एम पी एस सी द्वारे दरवर्षी पूर्णत्वास येत असते. मात्र, एवढ्या महत्वपूर्ण संस्थेच्या अध्यक्षपदी गेल्या दीड महिण्यापासून कोनीही विराजमान नसल्यामुळे लाखों तरुणांचे भविष्य पणाला लागले आहे.

हे ही वाचा 

डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच दिशा मिळाली…असे का म्हणाले मनोज जरांगे-पाटील

‘स्वस्त दरात ना नफा, ना तोटा’ मनसेचा उपक्रम सर्वत्र चर्चेत

मराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच

आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांचा कार्यकाळ 19 सप्टेंबर 2023 रोजीच संपला होता. त्यानंतर, आयोगाच्या अध्यक्षपदी रजनिश सेठ यांची निवड झाली असली तरी राज्य सरकारने त्यांना पोलिस महासंचालकपदाच्या जबाबदारीतून अजूनही मुक्त केले नाही त्यामुळे अजूनही रजनिश सेठ यांनी आयोगाचा पदभार स्वीकारला नाही. यामुळे, राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक परीक्षेतील सुमारे 10 हजार पात्र उमेदवारांच्या मुलाखती रखडल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी