31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

राज्यातील अनेक दुष्काळी तालुक्यांना दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्याचा आरोप होत आहे. अशातच आता सरकार दुष्काळावरूनही राजकारण करत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या काद्यांच्या आयातीवर कर लादण्यात आला होता. यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवला होता. कुठे तरी शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले होते, मात्र आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात ऐन दिवाळीत पाणी आणण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप आता रोहित पवारांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

काही दिवसात कांद्याच्या दरात घट झाली असून शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा उतरत्या दिशेने आहे. कांदा निर्यातीवर सरकारने काही दिवसांपूर्वी एक नाही, दोन नाही तब्बल ४० टक्के निर्यात शुल्क आकारले गेले. मात्र सरकारने यावर कोणताही तोडगा काढला नाही. आता शेतकरी कुठे तरी चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांनी काद्यांचे चांगले उत्पादन घेतले असून सरकार आता कांद्याचे दर कमी करत आहेत. कांद्याचे दर हे प्रति क्विंंटल दिड हजार रूपयांनी कोसळले आहेत. ८०० डॉलर किमान मूल्याचा अडथळा निर्माण करण्यात आला आहे. यावर रोहित पवारांनी सरकारला विनंती करत किमान निर्यातमूल्य तातडिने मागे घ्या असे सांगितले आहे.

हे ही वाचा

इस्रायलच्या हल्ल्यात बालकांचं काय होतंय?

रश्मिका मंदानाच्या नावावर काय खपवलं पाहा…

विराट कोहलीचे मी अभिनंदन का करायचे? ‘या’ संघाच्या कर्णधाराचा पत्रकारांना उलट सवाल

‘किमान निर्यातमूल्य मागे घ्या’ रोहित पवारांची सरकारला विनंती

माझी सरकारला विनंती आहे की, सरकारला शेतकऱ्यांची थोडी जरी काळजी असेल तर हे किमान निर्यातमूल्य तातडीने मागे घ्यावं आणि राज्यातील सामान्य माणसाठी वेळ मिळाला तर राज्य सरकारनेही त्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करावा, अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे. बाजारसमित्यांमध्ये कांद्यांची घसरण ही १००० ते १५०० रूपयांनी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे ४ ते ५ महिने टिकणारा कांदा हा आता ३ ते ४ महिन्यात खराब झाला आहे. यामुळे कमी दर आणि शेतात लावलेला कांदा सडून गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी