35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयचलनातून आणखी एक नोट आजपासून बाद

चलनातून आणखी एक नोट आजपासून बाद

अनेक वर्षे चर्चेत असलेली आणखी एक नोट आजपासून (8 ऑक्टोबर 2023) चलनातून बाद झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर चलनातून बाद करण्यात आलेली ही तिसरी नोट आहे. यापूर्वी एक हजार रुपये आणि 500 रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्यात आली होती. त्यात या एका नोटेची भर पडली आहे. रिझर्व्ह बँकेने पूर्वसूचना देऊनही ज्यांनी या नोटा बदलल्या नाहीत त्यांच्याकडील या नोटांचे मूल्य आता शून्य झाले आहे. या नोटा परत घेण्याची मुदत कालपर्यंत (7 ऑक्टोबर 2023) होती. त्यामुळे आता या नोटा तुमच्याकडे असतील तो फक्त एक कागद असेल, त्याला पैशाचे मूल्य नसेल, ही बाब लक्षात घ्या!

2 हजार रुपयांची गुलाबी नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत स्वीकारली जाणार होती म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून चलनातून बाद करण्यात येणार होती. पण 14 लाख कोटींच्या नोटा जमा न झाल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदतवाढ दिली होती. 2 हजार रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे या नोटा कालपर्यंत (7 ऑक्टोबर) चलनात होत्या. आता मुदतवाढ संपल्याने 2 हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत.
30 सप्टेंबरपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या मुदतीत 3.42 लाख कोटींच्या 2 हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या होत्या. म्हणजेच 96 टक्के नोटा सरकारकडे परत आल्या आहेत. याचाच अर्थ चार टक्के म्हणजेच 14 लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या. त्या नोटा परत येण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. 19 मे रोजी रिझर्व्ह बँकेने 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा 3.56 लाख कोटी मूल्याच्या 2 हजारांच्या नोटा चलनात होत्या.

हेही वाचा 

राज ठाकरेंनी टोलवरून उपसली तलवार, थेट मुख्यमंत्री शिंदेंना केला सवाल

धनंजय मुंडे म्हणतात, मला कामे करू द्या !

प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांना काढले सोलून !

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पुढे या 2 हजार रुपयांचे काय होणार? तर सरकारने याबाबत अजून स्पष्ट उत्तर दिलेले नाही. 2 हजार रुपयांच्या नोटा 8 ऑक्टोबरपासून व्यवहारात वापरल्या जाणार नसल्या तरी त्या चलनातून कायमस्वरुपी बाद करणार का, याबाबत लवकरच रिझर्व्ह बँक स्पष्टीकरण करेल, अशी अपेक्षा आहे.
16 नोव्हेबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची मोठी घोषणा केली होती. एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटा त्यांनी चलनातून लगेचच बाद करत असल्याची घोषणा करून देशाला मोठा आर्थिक धक्का दिला होता. काळापैसा रोखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावेळी स्पष्ट केले होते. चलनातून एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटा बाद झाल्यामुळे भारतीयांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती. लोक पैशांसाठी एटीएम, बँकेत रांगा लावत असल्याचे चित्र दिसत होते. लोकांकडे पैसे नव्हते. त्यावेळी चलनातील नोटांची तफावत दूर करण्यासाठी 2 हजार रुपयांची नोट व्यवहारात आणण्यात आली होती. आणि आता अवघ्या सात वर्षांत 2 हजारांची नोटदेखील चलनातून रद्द करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी