27 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयजयकुमार गोरे म्हणतात, आम्ही विरोधकांना तुरूंगात टाकू; विरोधकांनीही दिले खणखणीत उत्तर !

जयकुमार गोरे म्हणतात, आम्ही विरोधकांना तुरूंगात टाकू; विरोधकांनीही दिले खणखणीत उत्तर !

राज्यात सध्याचं राजकारण हे वेगळ्या वळणावर गेलेलं पाहायला मिळत आहे. मग ते शहर असो वा खेड  सर्विकडे राजकारणाची परिस्थिति ही पेचात पाडणारी आहे. फक्त शहरात नाही तर ग्रामीण भागातील माण – खटाव तालुक्यात देखील हीच परिस्थिति पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हा सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. या तालुक्याचे आमदार  जयकुमार गोरे आहेत. हे नेहमीच कोणत्यानं कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. मात्र आता हे एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. स्थानिक बैठकीत जयकुमार गोरे यांनी मायणीच्या देशमुख बंधुंचा उल्लेख करत आम्ही काय करू शकतो, वेळ आली तर तुरूंगातही टाकु शकतो. असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे माण तालुक्यातील वातावरण हे चिघळू लागलं आहे. यावर आता देशमुख घराण्यावर आरोप केलेल्यांपैकी दीपक देशमुख यांनी देखील प्रेसनोट द्वारे जयकुमार गोरेंना फटकारले आहे.

काय लिहिलं होतं प्रेसनोटमध्ये 

जयकुमार गोरे आपण काय केले आहे. हे जनतेला कळू लागले आहे. मयत झालेल्या माणसांच्या टाळुवरचे लोणी खाणार्‍याने आमची मापे काढू नये अन्यथा आम्हांला तुमची लायकी जनतेला दाखवावी लागेल असे मत मायणी मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी एका प्रसिध्दीपत्रकात मांडले. तुम्ही प्रत्येकवेळा देशमुखांवर घसरता तुमची आजची कारकिर्द आहे ती केवळ देशमुखांमुळेच आहे. हे तालुक्याला माहिती आहे. गेल्यावेळेस तुम्ही किती मताने निवडून आला हे लक्षात ठेवा, केवळ डॉ.एम.आर.देशमुख यांच्यामुळेच तुम्ही आमदार झाला आणि त्याच डॉ.एम.आर.देशमुखांच्या संस्था बळकावण्यासाठी तुम्ही देशमुखांना तुरूंगात डांबले ही जनतेला माहिती आहे. मायणीचे देशमुख लेचेपेचे नाहीत मेडीकल कॉलेजच्या जीवावर तुम्ही पैसे कमावून (कोवीड घोटाळा, स्टॅम्प ड्युटी घोटाळा) करूनच आलीशान गाड्या घेतल्या. ते आम्ही आता जनतेला पुराव्यानिशी दाखवून देणार आहोत. तुमचा खरा चेहरा जनतेसमोर आणणारआहोत. असा खोचक टोला देशमुख यांनी लगावला आहे.

 

हेही वाचा 

चलनातून आणखी एक नोट आजपासून बाद

इस्रायल-पॅलेस्टिनींमुळे जगावर युद्धाचे संकट, तर कॅनडा-इराणमध्ये जल्लोष

चंद्रकांतदादांनी केंद्र सरकारला लिहिले पत्र

आम्ही खचणार्‍यातले नाही

तुम्हांला वाटत असेल की, देशमुखांना ई.डी (खोटे गुन्हे) लावुन तुरूंगात डांबले म्हणजे आम्ही खचून जाऊ तुमच्याकडे मिटवायला येवू. परंतु आम्ही खचणार्‍यातले नाही. उलट आपणच दहा वेळा मिटवण्यासाठी निरोप पाठवला होता याचा अर्थ असा होतो की, आपल्या पायाखालची वाळू सरकली असून आपण तोंडघशी पडणार हे नक्की. सदरची संस्था फुकट मिळत नाही असे लक्षात आल्यानंतर चालु असलेली संस्था बंद पाडण्यासाठी पर्यायी शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करून संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न केला, त्या संस्थेच्या जीवावर उदरनिर्वाह चालत असल्यामुळे शेवटी नियतीला ते अमान्य होते संस्था बंद पाडण्यासाठी तुम्ही केलेला खटाटोप निष्फळ ठरला.

 तालुक्यातील तरुण राजकारणातून संन्यास घ्यायला सांगतील

कालच्या एका सभेत आपण म्हणाला की, मी उद्योगधंद्यातून गाड्या घेतल्या आहेत. आधी उदयोगधंदे कोणते आहेत. आतापर्यंत तालुक्यातील तरुणांना काय रोजगार दिला? याबाबत माण – खटावमधील लोकांना का सांगत नाही? असा प्रतिसवाल देशमुख यांनी केला आहे. तर पुढे देशमुख म्हणाले की, एका बड्या नेत्याला घेऊन आपण तालुक्यात सुरू होणार कारखाना बंद पाडला. या कारखान्यात शेकडो तरुणांना नोकरीची संधी मिळणार होती. बेरोजगार असलेली तरूण पिढी तुम्हाला राजकरणातून एक दिवस संन्यास घ्यायला लावतील हे नक्की.

आम्ही देशमुख म्हणजे वाघाचे बछडे

जयकुमार गोरे आम्ही देशमुख म्हणजे वाघाचे बछडे आहोत भले ते मायणीचे असो, निमसोडचे असो किंवा लोधवडेचे असो. यापुढे देशमुखांच्या नादाला लागाल तर तुमची राजकीय कारकिर्द संपविल्याशिवाय गप्प बसणार नाही, तुम्ही आमचा हा इशारा समजावा. असे मायणी मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी प्रेसनोट लिहुन जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी